21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसोलापूरकारमधून लाखोंचा गांजा पोलिसांनी पकडला

कारमधून लाखोंचा गांजा पोलिसांनी पकडला

एकमत ऑनलाईन

सांगोला : आषाढी वारीची धामधूम सुरू असताना रात्रगस्तीवरील पोलिसांनी कारचा पाठलाग करून ४३ लाख ६६ हजार ४०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास महूद- दिघंची रस्त्यावर महूद पोलिस पथकाने ही कारवाई केली.

याबाबत सहायक फौजदार कल्याण ढवणे यांनी फिर्याद दिली असून सांगोला पोलिसांनी संग्राम मल्लाप्पा पुजारी (रा. पुसेगाव, दिघंचीकडे दामटली. पोलिसांन भवानीनगर, ता. खटाव, जि. सातारा, मूळ रा. मारुतीनगर, मुद्देबिहाळ, जि. त्यांनी खाक्या दाखवताच कारमधून विजापूर, कर्नाटक) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान आरोपीने गांजा कोठून आणला, कोणाला विक्री करणार होता.

गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याची माहिती गोळा केली जात असल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले. सांगोला पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार कल्याण ढवणे व चालक पोलीस शिपाई सुनील लोंढे हे दोघेजण कटफळ औटपोस्ट हद्दीत रात्रगस्त घालीत होते.दरम्यान त्यांना महूद दीघंची रस्त्याकडेला सिल्व्हर रंगाची कार अंधारात संशयास्पदरीत्या थांबलेली आढळून आली.त्यांनी चालकास आवाज दीला असता दरवाजा न उघडता त्याने वेगाने कार दीघंचीकडे पळवली.पोलीसांनी पाठलाग करून कार पकडली.पोलीसी खाक्या दाखवताच चालकाने नऊ पोत्यात चीकटपट्टीने चीकटवलेली गांजाची पाकीटे काढून दीली.

या वेळी पोलिसांनी कारमधून जवळपास ४३ लाख ६६ हजार ४०० रुपये किमतीचा २१८ किलो गांज पकडला. या कारवाईत पोलिसांनी कार ( एमएच ४३, एजे २३२७) आणि मोबाईल व दोन वेगवेगळ्या नंबरच्या प्लेट जप्त केल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या