श्रीपुर (दादा माने ) : श्रीपुर ता.माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी आज कारखाना कार्यस्थळावर मिटींग हॉल मध्ये सर्व संचालक मंडळांच्या उपस्थिती मध्ये जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांची निवड करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी माजी चेअरमन स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे निधन झाल्यामुळे सगळीकडे दुःखाचे वातावरण होते. पांडुरंग कारखान्याच्या चेअरमन पदाची जागा गेले काही दिवसांपासून रिक्त होती.
या जागेसाठी संचालक मंडळामधून कोणाचाही मागणी अर्ज आलेला नव्हता. शोक सभे मध्ये सर्व संचालक, कार्यकर्त्यांनी व व्हा.चेअरमन वसंत नाना देशमुख यांनी आपण सर्वांनी प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करूयात असे आव्हान देखील केले होते. यानंतर चेअरमन कोण होणार? याची सर्व कार्यकर्त्यांना, सभासदांना उत्सुकता होती. आज बोर्ड मीटिंग घेण्यात आली.
त्यामध्ये निवड प्रक्रिया पूर्ण करून सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक यांची पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली. यावेळी सर्व संचालक मंडळ, पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
मराठा आरक्षणासाठी आता कायदेशीर लढाई लढावी लागेल