20.8 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeसोलापूर‘प्रिसिजन’ने केली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसची निर्मिती

‘प्रिसिजन’ने केली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसची निर्मिती

एकमत ऑनलाईन

सोलापूर : ई-व्हेईकलच्या जगतात येथील प्रिसिजन उद्योग समूहांतर्गत नेदरलँड स्थित ई-मॉस कंपनीने भारतात प्रथमच रेट्रोफिंिटग ही संकल्पना प्रत्यक्षात आणत रेट्रोफिटेड इलेक्­ट्रिक बसची निर्मिती केली आहे. पेट्रोल व डिझेलवर चालणा-या वाहनांमध्ये हे तंत्रज्ञान वापरून ही वाहने इलेक्­ट्रिक बनवली जातात. जगभरात प्रदूषण कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नात प्रिसिजन उद्योग समूहाने मोठे पाऊल उचलले आहे. प्रिसिजन उद्योग समूहाचे अध्यक्ष यतिन शहा व कार्यकारी संचालक करण शहा यांनी ही माहिती दिली.

प्रिसिजन उद्योग समूहाने भारतात पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्­ट्रिक बस बनविली आहे. या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिझेलवर चालणा-या 23 आसन क्षमतेच्या प्रवासी बसचे रूपांतर इलेक्­ट्रिक बसमध्ये करण्यात आले आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. ही बस एका चार्जिंगमध्ये 180 किलोमीटर धावणार आहे. मागील वर्षभरापासून सुरू असलेला हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संस्थेने या बसच्या तांत्रिक तपासणीसाठी सहकार्य केले आहे. जगभरात प्रदूषण कमी करण्यासाठी ई-व्हेईकल्सचा पर्याय समोर येत आहे. नवीन ई-वाहने निर्मितीचा खर्च मोठा असतो. त्यामुळे जुन्या वाहनाचे रेट्रोफिंिटग ही संकल्पना समोर आली आहे. यामध्ये वाहनाचे पूर्वीचे इंजिन काढून त्याऐवजी इलेक्­ट्रिक ड्राईव्हलाइन बसवले जाते.

प्रिसिजन उद्योग समूहाने 2018 मध्ये ई मॉस ही नेदरलँड स्थित कंपनी संपादित केली.
त्यामुळे वाहनाचे इलेक्­ट्रिफिकेशनचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. ई मॉसने आतापर्यंत 600 पेक्षा अधिक जड वाहनांचे इलेक्­ट्रिफिकेशन केले आहे. भारतात रेट्रोफिटेड बस तयार करताना या बसचे 60 टक्­क्­यांपेक्षा अधिक पार्ट भारतात बनवले गेले आहेत. पुढील काळात सर्वच सुटे भाग भारतीय बनावटीची असावेत, असा प्रयत्न केला जाणार आहे. युरोपातील हे तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेसाठी उपलब्ध केले जाणार आहे. माल वाहतूक करणा-या वाहनांसाठी हे तंत्रज्ञान प्राधान्याने वापरले जाणार आहे. याशिवाय प्रिसिजन उद्योग समूहाने शहरात पहिले ई-चार्जिग सेंटर देखील उभारले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या