26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeसोलापूरविठुरायाच्या दर्शनाची तयारी पूर्ण; ७ ऑक्टोबर पासून दररोज १० हजार भाविकांना मिळणार...

विठुरायाच्या दर्शनाची तयारी पूर्ण; ७ ऑक्टोबर पासून दररोज १० हजार भाविकांना मिळणार मुखदर्शन

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन आता दररोज १० हजार भाविकांना मिळणार आहे. कोरोना चाचणी गरजेची नसली तरी आरोग्य तपासणी करूनच मंदीरात सोडले जाणार आहे. अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज दिली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन भाविकांना मिळणार आहे. या संदर्भातच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज बैठक पार पडली.

विजया दशमी पासून सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये पंढरपूर मधील स्थानिक भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. तर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दर्शन दिले जाणार आहे. दर तासाला सातशे ते एक हजार भाविकांना मुख दर्शनाची व्यवस्था केली आहे. यामधे ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन दर्शन दिले जाणार आहे.

दहा वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील नागरिक आणि गर्भवती महिलांना शासन आदेशानुसार दर्शनासाठी बंदी कायम ठेवली आहे. दर्शनास येणा-या भाविकांची कोरोना टेस्ट सक्तीची असणार नाही. मात्र दर्शन रांगेत आल्यानंतर सर्व भाविकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच मंदिरांमध्ये काम करणा-या सर्व कर्मचा-यांची कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.

दरम्यान राज्यात पहिल्या आणि दुस-या लाटे दरम्यान मंदीरं बंद होती. त्यामुळे मंदीरावर अवलंबून असलेले लोक, त्याच नागरिकांना आपल्या देवाचं दर्शन घेता येत नव्हते. आता राज्य सरकारने मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत कोरोना नियमांचं पालन करुन लोकांना दर्शन देणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या