24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeसोलापूरहाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावा

हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावा

एकमत ऑनलाईन

बार्शी (विवेक गजशिव) : बार्शीतील सर्व पक्ष,संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हाथरस घटनेचा निषेध केला.या आंदोलनाचे आयोजन भीमनगरच्यावतीने करण्यात आले होते.यावेळी भीमनगर व सर्वपक्षीय संघटनेच्यावतीने राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष ॲड.सुप्रिया बोराडे-गुंड यांच्यावतीने नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांना निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आल्या.

यावेळी बऱ्याच कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका करत एका वाल्मिकी समाजाच्या दलित मुलिचा बलात्कार झाल्यानंतर तिचा संशयास्पद मृत्यु कसा होतो ? असा प्रश्न उपस्थित केला.तेवढ्यावरही सरकार गप्प न बसता त्या पीडितेचे शव तिच्या घरच्यांना न देता तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार कसे केले जातात असाही मोर्चेकरांनी प्रश्न उपस्थित केला.

तसेच महिला आयोगाही चिडीचूप असल्यामुळे महिला आयोगावर संशय व्यक्त करण्यात आला.यावेळी निवेदनात उत्तर प्रदेश राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी.आरोपींना कठोर शासन करून फाशीची शिक्षा देण्यात यावी.तपास सीबीआयकडे देण्यात यावा. ॲट्रॉसिटी कायदा आणखी कडक करून दलितांना संरक्षण देण्यात यावे.महिला आयोगात अध्यक्ष म्हणून दलित महिलेची नेमणूक करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

जगात भारतीय मुस्लीम सर्वात समाधानी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या