माळशीरस : बाबरी मशिद शिवसेनाप्रमुख पाडण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिक यांची भूमिका नसल्याचे वक्तव्य करणाऱ्या उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डोक्यावर खोबरेल तेल ओतून अनोख्या पध्दतीने निषेध व्यक्त केला.
तसेच असे बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे. यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख साळुंखे, उपतालुकाप्रमुख दत्ता साळुंखे, युवासेना अकलूज शहरप्रमुख शेखर खिलारे, रमेश काकडे, मिलिंद मोरे, आप्पा महाडिक, प्रशांत पवार, शहाजी इंगळे, विकास
भोई, रोहित इंगळे, अविनाश भोई, अक्षय पराडे, शुभम भोई, रामभाऊ इंगळे, सचिन ताटे, सचिन भोई, नवनाथ इंगळे, दीपक ताटे, सचिन इंगळे, सिधू गायकवाड, लाव्हा पराडे उपस्थित होते.