सोलापूर : मराठा समाजाला न्याय देवून भरती प्रक्रिया राबवू असे आश्वासन देवून मराठा समाजाला डावलून सरकार भरती प्रक्रिया राबवत असल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज सोलापूरच्या वतीने जुनी मिल कंपाउंड येथील विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर बुधवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. शासनाने सर्व प्रक्रिया पार पाडून निवडीसाठी पात्र असणा-या तमाम मराठा उमेदवारांना शासकिय सेवेत सामावून घेणे आवश्यक आहे. शासनाने कोरोना काळात ही प्रक्रिया पुढे ढकलली असल्याने या अडचणी निर्माण झाल्या असल्याने या उमेदवारांच्या निवडीही सर्वस्वी राज्य शासनाची जबाबदारी आहे.
सर्वोच्च न्यायालयात स्थगिती उठविण्याबाबत व घटनापीठ स्थापन करण्याबाबत लवकरच सुनावणी होणार असताना जाणीवपूर्वक २ डिसेंबर रोजी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने कागदपत्रे पडताळणी केली जात आहे. यामुळे मराठा उमेदवारांमध्ये संतापाची लाट असून ही पडताळणी प्रक्रिया लांबवून ती सर्वोच्च न्यायालयाच्या तारखेनंतर घ्यावी अशी मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांनी केली.
यावेळी सुपर मार्केट येथील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळयास सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, प्रियांका डोंगरे, भाऊसाहेब रोडगे, अमोल भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जुनी मिल कंपाउंडमधील विद्युत मंडळाच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.
पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांचा लातूर कपडा बँकेतर्फे गौरव