31.7 C
Latur
Friday, March 31, 2023
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ : फडणवीस

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ : फडणवीस

एकमत ऑनलाईन

सोलापूर : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. शासनाने दिलेल्या कमाल आर्थिक मर्यादेनुसार बैठकीत ५०२.१४ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर जिल्हाच्या सर्वागीण विकासासाठी भरीव निधी देऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

तसेच कृषी व संलग्न सेवा, ग्रामविकास, लघुपाटबंधारे, ऊर्जा विकास, उद्योग व खाणकाम, सामाजिक व सामूहिक सेवा, नावीन्यपूर्ण योजना, पशुसंवर्धन, रस्ते व नगर विकास, शिक्षण विभाग, पर्यटन विकास आदींसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त १६६.७६ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ चा प्रारूप आराखडा व २०२२-२३ मधील यंत्रणास्तरावरील झालेल्या निधी खर्चाची, तसेच गत पाच वर्षांत राज्यस्तरीय बैठकीत मिळालेल्या वाढीव निधींच्या खर्चाची टक्केवारी जवळपास १०० टक्के असल्याची माहिती दिली.

या बैठकीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील प्रवरा लोणी (जि. अहमदनगर) येवून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालय येथून खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र पोलिस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष राऊत, राम सातपुते याच्यासह सरदेशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पुंडलिक गोडसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी यशवंत माने आदींसह, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित प्रारूप आराखडा तयार करताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय आहे. अतिरिक्त मागणी करताना धार्मिक व पर्यटन स्थळांचा विकास, महिला व बालविकास, शैक्षणिक क्षेत्राचा विकास, जलसंधारण, उद्योगधंद्यांमध्ये वाढीसाठी उपयुक्त योजनांचा समावेश या बाबीच्या विकासावर भर देण्यात आला आहे असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यानी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या