24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसोलापूरसार्वजनिक गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करणार

सार्वजनिक गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करणार

एकमत ऑनलाईन

सोलापूर : यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पाश्चात्य विकृती, अधार्मिक कृती टाळण्यासाठी तसेच आरोग्यास हानीकारक ठरणारे कर्णकर्कष संगीत टाळून उत्सवाचा मूळ हेतु असणारे हिंदूंचे संघटन प्रभावीपणे करण्याचा निर्धार सोलापूरातील सार्वजनिक उत्सव मंडळांनी केला. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या कसा साजरा करावा’ या विषयावर बोमड्याल शाळेजवळील गणेश मंदिरामध्ये सोलापूरातील सार्वजनिक उत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली.

बैठकीला शहरातील युनिक टाऊन गणेश मंडळाचे नागेश सरगम, वीर महागणपती ट्रस्टचे अधिवक्ता रमाकांत बापट, शिवशंकर अंजनाळकर, ब्रह्मानंद गणपती गणेश मंडळाचे संदीप बेलमकर, महेश जानकर यांसह ४५ पदाधिकारी उपस्थित होते. श्री गणेशाच्या आरतीने बैठकीला प्रारंभ करण्यात आला. या वेळी ंिहदु जनजागृती समितीचे विक्रम घोडके यांनी उपस्थितांना बैठकीचा उद्देश सांगितला. तर राजन बुणगे यांनी ‘आदर्श सार्वजनिक उत्सव कसा साजरा करावा’ याविषयी मार्गदर्शन केले, सनातन संस्थेच्या कु. वर्षा जेवळे यांनी ‘सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक दृष्टीने उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. बैठकीमध्ये सार्वजनिक उत्सव मंडळांनी यंदाच्या श्री गणेशोत्सवात ‘डी.जे’ ऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्याचा, तसेच मंडळाच्या माध्यमातून धर्मजागृती करण्याचा निर्धार केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या