सोलापूर : नऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला विशेष न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा याची सुनावणी विशेष न्यायाधीश आव्हाड यांच्यासमोर झाली, यात सरकारतर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुनावली. प्रदीप नागनाथ हुळ्ळे (वय ३२) असे शिक्षा ग्रा धरून न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारच्या वतीने अॅड. शीतल डोके यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड. राम जाधव यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून तांबोळी यांनी काम पाहिले.
पीडिता ही दुधाची पिशवी आणण्याकरिता गेल्यानंतर आरोपी प्रदीप याने त्या बालिकेस दुकानात बोलवून तिच्यावर अत्याचार करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी शहरातील पोलिस ठाण्यात पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी करून याबाबत न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले होते. विशेष म्हणजे आरोपीला शिक्षा झाल्यानंतर आरोपीने न्यायाधीश आव्हाड यांच्या न्यायालयातच जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्जदेखील न्यायालयाने नामंजूर केला आहे.