24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeसोलापूरकचरा न देणा-यांवरही आता होणार दंडात्मक कारवाई

कचरा न देणा-यांवरही आता होणार दंडात्मक कारवाई

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहर कचरामुक्त करण्यासाठी ओला व सुका कचरा विलगीकरण, सिग्रेशन प्रक्रिया आदी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. कचरा रस्त्यावर टाकू नये, यासाठी आपण दंड आकारत आहे. रोजच्या रोज कचरा न देणा-यांवरही आता दंडात्मक कारवाई करून शहरातील कचरापाईंट कमी करण्यासाठी प्रयत्न राहणार आहे, असे मनपा उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या जिओ टॅगिंगनंतर आता महापालिका ओला व सुका कचरा विलगीकरणावर अधिक भर देणार आहे. शहरातील कचरा पाईंट कमी करण्याच्या दृष्टीने नियम कडक करण्यात येत आहेत.

कचरा रस्त्यावर टाकल्यास ५०० रुपयांचा दंड आहे. आता रोजच्या रोज कचरा न देणा-यांवर देखील ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने विभागीय कार्यालयातील एमआय यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी ऑनलाईन अ‍ॅपच्या आधारे कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. आता घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहर कचरामुक्त करण्यासाठी महापालिका उपाययोजना करीत आहे. घरोघरी, सोसायटीमधील कचरा संकलन करण्याबरोबर तो ओला व सुका असा विलगीकरण करूनच घेण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा महापालिकेकडून अद्ययावत करण्यात येणार आहे.

सोसायट्यांमध्ये जनजागृती करणे, अस्थापनधारकांची बैठक घेणे, संबंधित परिसरातील कचरा पाईंट कमी करण्यासाठी जनजागृती करणे आदी प्रबोधनपर उपक्रमातून कचरा विलगीकरणाबाबत नागरिकांची सकारात्मक मानसिकता वाढीस लावण्यासाठी विभागीय कार्यालयातून कामकाज होण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक यंत्रणा खरेदी करणे आदींचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे. ओला व सुका कचरा विलगीकरणयुक्त असलेल्या नव्या ३२ गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. शहरातील प्रत्येक कचरापाईंट जीओ टॅगद्वारे जोडून तेथे वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या