27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरसोलापुरात पीडब्ल्यूडीचा कारकुन चतुर्भुज

सोलापुरात पीडब्ल्यूडीचा कारकुन चतुर्भुज

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : जमीन वाणिज्य व्यवसाय प्रयोजनासाठी बिगरशेती (एनए) करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तीस हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून पंधरा हजार स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयातील भांडार कारकुनास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले.

चंद्रकांत अभिमन्यू टोणपे (५८) असे या लाचखोेराचे नाव असून, त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी (दि. १३) पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कार्यालयात एकाने जमीन एनए करण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्याचा पाठपुरावा करताना त्यांनी चंद्रकांत अभिमन्यू टोणपे (५८, भांडार कारकून, नेमणूक- उपविभागीय अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर) याची भेट घेतली.

त्यावेळी टोणपे याने या कामासाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजारांत सौदा ठरला. ही रक्कम ठाकरे चौक, नवीन कराड नाका, पंढरपूर येथे टोणपे स्वत: स्वीकारत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पुणे एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनखाली पर्यवेक्षण अधिकारी संजीव पाटील, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, प्रमोद पकाले, सलीमा मुल्ला, उमेश पवार, शाम सुरवसे यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या