29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeसोलापूरबोरामणीत मन्ना जुगार खेळणाऱ्यांवर छापा

बोरामणीत मन्ना जुगार खेळणाऱ्यांवर छापा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) शिवारातील कारंजा तांड्यातील पाण्याच्या टाकीजवळील पत्राशेडमध्ये ५२ पत्त्यांचा अंदर-बाहर नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. आठजणांना पकडून १४ हजार ६४० रुपयांची रोकड आणि दुचाकीसह एकूण सहा लाख ६४ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला.

कारंजा तांडा परिसरात काही तरुण मन्ना जुगार खेळत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी गोलाकर बसलेल्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एक चारचाकी, दोन दुचाकीसह काही रोकड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक खुणे, उपनिरीक्षक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार शिवाजी घोळवे, पोलिस हवालदार परशुराम शिंदे, मोहन मनसावाले, लालसिंग राठोड, यश देवकते, सूरज रामगुडे, समर्थ गाजरे, प्रमोद माने यांच्या पथकाने केली.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या