20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeसोलापूरपंढरपूरजवळ वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या लॉजवर छापा

पंढरपूरजवळ वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या लॉजवर छापा

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपूर-सांगोला मार्गावर शहरानजीक असलेल्या हॉटेल आनंद लॉज येथे पोलिसांनी छापा टाकून चालू वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन महिलांची सुटका केली असून लॉज चालकास अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली असून अवैधरित्या रुम देणा-या लॉज मालकांचे धाबे दणाणले आहे.

पंढरपूर-सांगोला रोडवर शहरानजीक असलेल्या हॉटेल आनंद लॉज येथे अवैद्य वेश्याव्यवसाय चालु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी एका इसमाला पाठवून सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली असता सदर लॉजवर तीन महिला दिसून आल्या.

त्यांच्याकडून हॉटेल मालक लक्ष्मण वसंत चौगुले (वय- वर्षे ६० रा. पंढरपूर) हा आपल्या आर्थिक हेतूसाठी या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे दिसून आले त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून तिन्ही महिलांची सुटका केली आहे. तर आरोपी लक्ष्मण चौगुले याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिंिलद पाटील यांच्या पथकाने केली आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या