31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeसोलापूरकुंटणखान्यावर धाड, तिघींना अटक

कुंटणखान्यावर धाड, तिघींना अटक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : विजापूर रोडवरील शांतीनगर येथेचालणाऱ्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकत एका पीडितेची सुटका केली; तर दोघींना अटक केली. यातील घरमालकिणीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

विजापूर रोडवर कुंटणखाना चालू असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंधक वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी बोगस गि-हाईक पाठवून खात्री केली. त्यानंतर त्यांनी छापा टाकून कारवाई केली. यात कांचन प्रवीण पवार (वय ३८, रा. कमलानगर), महादेवी शरणगौडा पाटील (वय ५२, रा. सरवदेनगर), कमल ऊर्फ नंदा एकनाथ गणेशकर (रा. शांतीनगर) हे एका महिलेस घरात अटकावून ठेवून तिची शारीरिक पिळवणूक करीत होते. यात एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. यात कांचन पवार, महादेवी पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे; तर कमल गणेशकर हिचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलिस उपायुक्त ड दीपाली काळे, सहायक पोलि आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे यांच्य मार्गदर्शनाखाली अनैतिक मान वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलि निरीक्षक बजरंग साळुंखे, सहायक फौजदार राजेंद्र बंडगर, महादेव बंडगर पोलिस नाईक अ. सत्तार पटेल, अकील नदाफ, नफिसा मुजावर, तृप्ती मंडलिक, रमादेवी भुजबळ, मळगे, सीमा खोगरे, दादा गोरे यांनी केली.

पीडितेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते. तसेच तिच्या कमाईवर स्वतःची उपजीविका करीत होते. त्यांच्या विरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार विजापूर नाका पोलिस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल. करण्यात आला.गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या