37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeसोलापूरअकलाई माता मंदिर परिसरात शिरले पावसाचे पाणी

अकलाई माता मंदिर परिसरात शिरले पावसाचे पाणी

एकमत ऑनलाईन

अकलूज : बुधवार दि. १४ रोजी पहाटे ३ वाजता सुरु झालेला पाऊस राञी ८ वाजता थांबला. सलग १८ तास पाऊस पडल्यामुळे अकलूज शहरातील प्रतापसिंह चौक, गांधी चौक, कर्मवीर चौक येथील ओढ्यांचे पाणी रस्त्यावर येऊन वाहतुक प्रभावित झाली. नविन बस स्थानक, विजय चौक येथे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते.

निरा नदिच्या किना-यावर असलेल्या घरांच्या जवळ पाणी आले आहे. तर अकलाई मंदिराच्या प्रांगणात पाणी आल्यामुळे बगीचा जलयम झाल्याचे दिसले. सध्या विर धरणातून निरा नदिमध्ये पहाटे पाच वाजता ५४ हजार तर सकाळी ११-३० वाजता ४१ हजार ७३३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. कर्हा नदितून बारामती मार्गे २ हजार ५०० क्युसेक्सचा विसर्ग निरा नदिमध्ये सुरू आहे. रात्री १२ वाजता उजनिमधून भिमा नदिमध्ये १ लाख ४० हजार तर सकाळी ११ वाजता २ लाख ९१ हजार ३११ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. निरा नदिला ओढे व नाल्यांमधून विसर्ग सुरू असल्यामुळे पुर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अकलूज येथील नदिच्या किनारी असलेल्या नागरीकांना सावधगिरीचा ईशारा देण्यात आला आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांनी आज सकाळी ७ वाजता निरा नदी किनारी असलेल्या सहकारनगर, लोणार गल्ली, किल्ला परिसराला भेट देवून पाऊस व नदिच्या पाण्याच्या परिस्थितीची पाहणी केली. नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी अधिका-यांना सुचना दिल्या. यावेळी तहसिलदार जगदिश निंबाळकर उपस्थित होते.

रानगटवस्ती, पिंपरी, ता. माळशिरस येथील पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे तेथिल पाणी काढून देण्याचे काम सुरू असल्याची माहिती अभियंता ए.जे. इंगळे यांनी दिली. माळशिरस तालुक्यात दि. १५ रोजीचा पावसाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. माळशिरस १३९ मिमी, सदाशिवनगर ११९, इस्लामपूर १२२, नातेपुते १०५, दहिगाव १२४, पिलीव १२४, वेळापूर १३६, महाळुंग १६०, अकलूज १०५, लवंग १६२ एकूण १ हजार २९६ मिमी व सरासरी १२९.६ मिरमी पावसाची नोंदण करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता अमोल मस्कर यांनी दिली. कोंडबावी मधील नदि किनारील यादव वस्ती, दांगट वस्ती, घाडगे, मिसाळ व सुद्रिक वस्ती पुराच्या पाण्याखाली गेल्या आहेत. तर आनंदानगर येथे नागारीकांच्या घरांमध्ये निरा नदीचे पाणी घुसल्याने त्यांच्या राहण्याची तात्पुरती सोय सरपंच मेघना इनामदार यांनी जि. प. शाळेमध्ये करून दिली आहे.

ज्या भागामध्ये नागरीकांना आन्नधान्याची गरज आहे तेथिल नागरीकांना अन्नधान्य पुरवठा करण्याचे आदेश आमदार राम सातपूते यांनी दिले आहेत. तालुक्यातील नागरीकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिल्याचे आमदार सातपुते यांनी सांगितले. अकलुज येथील जयशंकर नगर व निरामय नगर परिसरात अतिव्रष्टीमुळे व निरा नदिला आलेल्या पुरामुळे पाण्यात गेलेल्या घरांची व नुकसान झालेल्या परिवारांची भेट सोलापूर जिल्हा परिषदेच्या लोकप्रिय जि.प.सदस्या मा.सौ.शितलदेवी मोहिते पाटील यांनी घेतली व पुरात नुकसान झालेल्या परिवारांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था करुन दिली यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्या मा.सौ.हसिना शेख ग्रा.पं.सदस्य.मा.राहुलजी ( बंटी ) जगताप मा.विशाल फुले.मा.आदित्य आर्वे व परिसरातील सर्व नागरिक व महिला उपस्थित होत्या सर्व जनांनी वहिनी साहेबांना आपल्या पाऊस व पुरामुळे आलेल्या अडचणी सांगितल्या .तसेच जनसेवा संघटना महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्षा व जनसेवक यांनी निरा नदीला पूर आलेवर छञपती शिवाजी महाराज यांचे पुतळे वाहुन चाललेले होते ते काढून ठेवले.

मोहोळ तालुक्यातील २० गावांना पुराच्या पाण्याचा वेढा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या