26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeसोलापूरपंढरपुरात वादळी वा-यासह पाऊस

पंढरपुरात वादळी वा-यासह पाऊस

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : वादळी वारे आणि अवकाळी पावसाने आज सायंकाळी पंढरपूर आणि परिसराला चांगलेच झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे बेदाणा, डाळिंब, शेवगा, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील शेतकरी शिवाजी हळणवर यांच्या बेदाणा शेडवरील पत्रे आणि कागद उडाल्याने ६ लाख रुपयांच्या तीन टन बेदाण्याचे नुकसान झाले आहे.

तर, पळशी येथील शेतकरी शेवाळे यांची दोन एकरावरील शेवग्याची बाग जमिनदोस्त झाली आहे. यामध्ये त्यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ऐन द्राक्ष काढणी हंगामात वादळी वारे आणि पावसाचा मोठा फटका बसला आहे.

५० एकरवरील केळीच्या बागा आडव्या
पटवर्धन कुरोली येथे जवळपास ५० एकर वरील केळीच्या बागा आडव्या झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अजूनही पाऊस सुरू असून नेमक्या नुकसानीचा आकडा समोर येत नसला तरी वादळी-वा-यामुळे अनेक ठिकाणी मोठी पडझड झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या