26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeसोलापूरअतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राजेंद्र मिरगणे थेट शेतकऱ्याच्या बांधावर

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राजेंद्र मिरगणे थेट शेतकऱ्याच्या बांधावर

एकमत ऑनलाईन

बार्शी : बार्शी तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते.त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी आगळगाव येथे शेतात जावून पाहणी करून केली.

यावेळी मिरगणे आगळगाव येथील सूरज डमरे,दिलीप डमरे या शेतकऱ्यांच्या शेतात जावून समक्ष भेट दिली व वस्तुस्थिती जाणून घेतली.यावेळी त्यांना या शेतातील उभे पिक सोयाबीन,उडिद,मुगाचे संपूर्णतः नुकसान झाल्याचे पहायला मिळाले.त्यामुळे मिरगणे यांनी लगेच तातडीने जिल्हाधिकारी शंभरकर,अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव,प्रांताधिकारी निकम,तहसीलदार जमदाडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती देऊन तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या.

तसेच महसुल व कृषी प्रशासनाने पुरावे नसल्याचे कारण दाखवून अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले होते.त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याची गरज असल्याचे मिरगणे यांनी सांगून प्रशासनाचे लक्ष वेधले.यावेळी प्रांताधिकारी निकम यांनी ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग व फोटो काढून ठेवावेत.भरपाई देण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे निकम यांनी सांगितले.यावेळी मिरगणे यांच्यासोबत बिभीषण पाटील,अविनाश शिंदे,मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे,बाजार समितीचे संचालक कुणाल घोलप,संभाजी सोनवणे,शिरीष घळके,बबन गायकवाड,विजयसिंह देशमुख,सूरज गव्हाणे,रविंद्र सांगोळे आदी उपस्थित होते.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रेडलाईट एरियात शालेय साहित्याचे वाटप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या