27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeसोलापूरबेलवाडीत उत्साहात रंगला मानाच्या अश्वांचा रिंगण सोहळा

बेलवाडीत उत्साहात रंगला मानाच्या अश्वांचा रिंगण सोहळा

एकमत ऑनलाईन

इंदापूर : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने बुधवार ( दि. २९ जून) रोजीचा सणसर गावचा मुक्काम करून, श्री संत तुकोबांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण सोहळा गुरुवार ( दि. ३० ) रोजी बेलवाडी ता. इंदापूर येथील गावातील पालखी मैदानावर उत्साहात वातावरणात पार पडले. तर तब्बल दोन वर्षांनंतर पायी पालखी सोहळा होत असल्याने वारक-यांनी वारीत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

यावेळी पालखीचे रिंगण सोहळ्यात आगमन होताच, बेलवाडीचे गावचे सरपंच माणिकराव जामदार, उपसरपंच रामचंद्र यादव, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अँँड. शुभम निंबाळकर, छत्रपती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, कारखान्याचे संचालक सर्जेराव जामदार, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे, विठ्ठल जाचक, दादासो गायकवाड, लक्ष्मणराव भिसे, शहाजी शिंदे, हनुमंत खैरे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पालखी विश्वस्त व पालखीचे प्रमुख नितीन महाराज मोरे यांचा बेलवाडी गावक-यांनी मानसन्मान केला.

ंिरगण सोहळ्यात धनगर समाजाच्या मानाच्या मेंढ्यांची प्रथम प्रदक्षिणा झाली. त्यानंतर झेंडेक-यांनी हरिनामाचा गजर करत ंिरगण पूर्ण केले. त्या पाठोपाठ डोक्यावर तुळशीवृंदावन व पाण्याचा हंडा घेतलेल्या महिलांनी जयघोष करीत धावत आपले ंिरगण पूर्ण केले. त्यापाठोपाठ विणेकरी यांनी पुंडलिक वरदा हरि विठ्ठल चा नामघोष करत ंिरगण पूर्ण केले.

तर मानाच्या अश्वांची पूजा पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे व तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व ंिरगणामध्ये मानाच्या अश्वांनी धाव घेतली, त्यावेळी उपस्थित वारकरी व हरीभक्तांनी हरिनामाचा जयघोष केला. टाळ्यांचा कडकडाट केला. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. गोल ंिरगण पार पडल्यानंतर भक्तांना दर्शनासाठी पालखी बेलवाडी गावच्या मध्यवर्ती भागात नेहण्यात आली.

बेलवाडी तेथे दोन तास पालखीचा विसावा झाल्यानंतर, पुढील मुक्कामासाठी पालखी अंथूर्णे गावाकडे प्रस्थान केले. तब्बल दोन वर्षांनंतर पालखीचा ंिरगण सोहळा उत्साहात पार पडल्याने, स्थानिक नागरिक व वारकरी यांच्यामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. संपुर्ण बेलवाडी परिसर हरिनामाच्या गजरात नाहून निघाला. तर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावल्याने ंिरगण सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.

यावेळी बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलीस कर्मचारी यांनी फुगड्यांचा आनंद लुटला तर पोलीस जवानांनी देखील वारक-यांसोबत फुगड्यांचा फेर धरला होता. ंिरगण सोहळ्यास उपस्थित तरुणांनी हातात पताका व पखवाज व टाळ घेवून वारीचा आंनद लुटला. बेलवाडी गावक-यांनी वारक-यांची मनोभावे सेवा केली. त्यामुळे पालखी विश्वस्त यांनी गावक-यांचा मानसन्मान केला.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या