26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरमलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजावर विनयभंगाचा गुन्हा

मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजावर विनयभंगाचा गुन्हा

एकमत ऑनलाईन

येरमाळा : राज्यभर प्रसिद्ध असलेल्या कळंब तालुक्यातील येरमाळा जवळील मलकापूर येथील श्री दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख एकनाथ लोमटे महाराज यांच्यावर एका भाविक महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ जुलै रोजी मलकापूर येथील मठात ही घटना घडली.

गुरूवारी दि. २८ जुलै रोजी मलकापूर येथील श्रीक्षेत्र दत्त मंदीर संस्थानचे (मठ) ह.भ.प.एकनाथ महाराज लोमटे यांच्या दर्शनसाठी परळी येथील ३५ वर्षीय महिला आली होती. मठातील दर्शन मंडपामध्ये महिला बसली असता महाराजांनी महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत महीलेच्या अंगास झोंबाझोंबी करीत महीलेचा विनयभंग केला. यावेळी महीलेने प्रतिकार करताच महिलेस मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. सदरील प्रकार घडताच मंदीर परिसरामध्ये प्रचंड गोंधळ उडाला. एकनाथ महाराजांनी सर्वत्र शांतता करत मंदीरातून पळ काढला. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून शुक्रवारी दि. २९ जुलै रोजी पहाटे येरमाळा पोलिस ठाण्यात एकनाथ महाराज लोमटे विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या