सोलापूर: तुमच्या मुलीला मला मेसेज करायला सांगा असे म्हणत पीडित तरुणीच्या आईला दमदाटी करून विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकृष्ण शिवाजी बनसोडे (वय २३, रा.सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. पीडित मुलीची आई, वडील, आजी घरी असताना आरोपी हा सकाळच्या सुमारास घराजवळ येऊन पीडित तरुणीच्या आईला म्हणाला की, तुमच्या मुलीला मला मेसेज करायला सांगा, मेसेज नाही केला तर मी तुमच्या घरावर दगडफेक करेन, असे म्हणून पीडित तरुणीच्या आईला दमदाटी केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कुकडे हे करीत आहेत.