28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeसोलापूरमहिलेचा विनयभंग, सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

महिलेचा विनयभंग, सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

एकमत ऑनलाईन

मंगळवेढा : तुम्ही आमचे घेतलेले २० हजार रुपये द्या असे म्हणून ४२ वर्षीय महिलेला मारहाण करून साडी ओढून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. तिच्या दिरास लोखंडी गज व बेल्टने मारहाण केल्याप्रकरणी अंकुश गरंडे, लक्ष्मण गरंडे, वसंत गरंडे, नाना गरंडे, तानाजी गरंडे, आण्णा गरंडे (रा. नंदेश्वर ) या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी, तिचे पती व दीर हे तिघे मोटरसायकलवरून घराकडे जात असताना वरील इसमांनी चारचाकी गाडीत येऊन तुम्ही माझे घेतलेले २० हजार रुपये द्या, असे म्हणाले. यानंतर फिर्यादी हे त्यांना आम्ही तुमचे पैसे थोडे थोडे करून दिले आहेत. परत कशाचे पैसे मागता असे म्हणत असताना त्यांनी फिर्यादीच्या दिरास पाठीवर, कमरेवर, मांडीवर, डाव्या हातावर, मनगटावर मारून गंभीर जखमी केले.

यावेळी फिर्यादीचे पती घाबरून निघून गेले. ही भांडणे सोडवत असताना फिर्यादीस आरोपीनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून साडी ओढून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या