सोलापूर : येथील एका विवाहित महिलेसोबत सोशल मिडियातुन ओळख निर्माण करुन तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या कडुन तब्बल २ किलो १७८ ग्रॅम सोने लुटुन बलात्कार केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या तरुणाचा जामीन अर्ज जिल्हासत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी फेटाळला.
याची थोडक्यात हकिकत अशी, श्रीधर श्रीनिवास रच्चा (वय ३२ रा. सोलापूर) या तरुणाने एका विवाहितेच्या फेसबुक अकाऊंटवर २०१९ मध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती.त्यास पिडितेने प्रतिसाद दिला नव्हता. तरीही रच्या याने वारंवार रिक्वेस्ट पाठवल्याने तिने ती स्विकारली, त्यानंतर त्यांच्यात ओळख वाढुन प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याचा गैरफायदा घेऊन तरुणाने काही फोटो, व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. तसेच विवाहितेकडुन वेळोवेळी एकुण १५ लाख १४ हजार रुपये आणि २ हजार१७८ ग्रॅम सोने घेतले होते. आणि तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता.
त्याबाबत पिडितेने दिलेल्या फिर्यादी वरून फौजदार चावडीच्या पोलिसांनी श्रीधर रच्या याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर आरोपीने सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर मुळ फिर्यादी पिडितेतर्फे अॅड. शशि कुलकर्णी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन आरोपीच्या जामीन अर्जास तीव्र विरोध केला. तसेच सरकारी वकील अॅड. दत्ता पवार यांनी आरोपीने थंड डोक्याने लुटमार करण्याच्या उद्देशाने शारिरिक अत्याचार करुन कसा गुन्हा केला.ते कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. सदर बाबींचा विचार सत्र न्यायालायाने सदर तरुणाचा जामीन अर्ज फेटाळला.
सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे ॲड. दत्ता पवार आरोपीतर्फे ॲड. संजय चव्हाण तर मुळ फिर्यादीतर्फे ॲड. शशि कुलकर्णी, ॲड. देवदत्त बोरगांवकर, ॲड. स्वप्निल सरवदे, ॲड. रणजीत चौधरी, ॲड. आशुतोष पुरवंत, ॲड. प्रसाद अग्निहोत्री यांनी काम पाहिले.