21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeसोलापूरनगरपालिकेवर राष्ट्रीय समाज पक्षाचा तिरडी मोर्चा

नगरपालिकेवर राष्ट्रीय समाज पक्षाचा तिरडी मोर्चा

एकमत ऑनलाईन

कुर्डूवाडी : निकृष्ट चिखलमय रस्ते व धुळीबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने राष्ट्रीय समाज पक्षाने नगरपालिकेवर तिरडी मोर्चा काढला. गेल्या १५ दिवसातील नगरपालिकेवर हा दुसरा मोर्चा ठरला. यावेळी अतुल शिंदे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

शहरात भुयारी गटारीच्या कामामूळे चिखल होत असल्याने वाहने घसरून काहींचे हात व पाय मोडण्याचे प्रकार घडत आहेत. नागरीकांनी तक्रार करूनही हालचाली होत नसल्याने यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने नगरपालिकेवर चिखलफेक मोर्चा काढला होता. त्यावेळी मुख्याधिकारी यांच्यासमवेत बैठक लावू असे लेखी आश्­वासन दिले होते. मात्र त्यानंतर नगरपालिकेने बैठक रद्द केल्याचे पत्र रासपच्या पदाधिका-यांना दिले. परिणामी नागरिकांची व राष्ट्रीय समाज पक्षाची दिशाभूल झाल्याचे सिध्द झाले. या फसवणूकीच्या निषेधार्थ रासपने भगवा झेंडा चौकापासून नगरपालिकेवर तिरडी मोर्चा काढला. नगरपालिका प्रशासनाची प्रतिमात्मक तिरडी हिसकावून घेत असताना पोलीस व आंदोलनकर्त्यामध्ये झटापट झाली.

शहरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करावे, शहरात विविध विकास कामे सुरू असल्याने मुख्याधिकारी यांनी कायमस्वरूपी शहरात रहावे, माढा रोडवरील नव्याने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व बालोद्यान समोरील चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे तसेच नेहरूनगर येथील कॅनल गटारीवर स्लॅब टाकावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. अतुल शिंदे यांनी निवेदन स्विकारले. प्रभारी मुख्य अधिकारी विना पवार यांच्याशी संपर्क साधून 3 ऑगस्ट रोजी बैठक लावून मागण्या मार्गी लावू असे लेखी आश्वासन देण्यात आले.

सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप गडदे, माढा लोकसभा अध्यक्ष माळाप्पा खांडेकर, धनाजी कोकरे अभिजीत सोलंकर, वैभवी भिसे, गोरख वाकडे, सोमनाथ देवकाते, सागर होनमाने, बाळासाहेब नगरे, विनायक गायकवाड, प्रियांका वाघमोडे, बजरंग सलगर, श्यामल माने, अमित होनमाने, अर्जुन शिंदे,सुरज गायकवाड, भागवत तांबवे, मल्हारी खरात, बंटी हनवते, कैलास खिलारे, किरण अस्वरे, सुग्रीव सलगर, विठ्ठल सोनवणे, लक्ष्मण सरवदे , शंकर खरात, दादासाहेब वाघमोडे ,सागर अस्वरे, प्रेम कांबळे, रोहित अडसूळ, सागर अस्वरे, सद्दाम पटेल, भाऊ गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते.

शुल्क माफीसाठी जोरदार निदर्शने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या