मोडनिंब : मोडनिंब व परिसरातील नागरिकांना महामार्गावरील होणाऱ्या अडचणींसंदर्भात मोडनिंब येथे सोलापूर- पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने आयोजित या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले.
मोडनिंबची बाजारपेठ व नागरिकांसाठी अडगळ ठरलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावावा. आवश्यकता भासल्यास बा वळण रस्ता काढावा. भीमानगर ते सोलापूर या संपूर्ण महामार्गावर सर्व्हिस रोड बनविण्यात यावा. माढ्याहून येणारा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला शेटफळजवळ धोकादायकरीत्या जोडला आहे, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे झेब्रा क्रॉसिंग अथवा दिशादर्शक फलक बसविण्यात आलेले नाहीत, ते ताबडतोब बसविण्यात यावेत. मोडनिंब येथील उड्डाणपुलावर हायमास्ट दिवे बसविण्यात यावेत.
वरवडे टोलनाक्यावर मोडनिंब व परिसरातील स्थानिक वाहनांना टोलपासून मुक्ती मिळावी आदी विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे, बहुजन सत्यशोधक संघाचे सुनील ओहोळ, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, भाजपचे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, भाजपचे नितीन गडधरे, राहुल केदार, धनाजी नितीन गडधरे, राहुल केदार, धनाजी लादे, शिवसेनेचे दीपक सुर्वे, बाबूराव
सुर्वे, कुरण गिड्डे, बालाजी पाटील, पोपट दोभाडा, नागनाथ ओहोळ, शाहू सोलंकर, मोहंमद शेख, बापू लोंढे, संतोष जानराव, संतोष वाघमारे, तानाजी जोगदंड, मल्हारी पाळके आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.