27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeसोलापूररत्नागिरी पोलिसांनी अल्पवयीन मुलामुलीला घेतले ताब्यात

रत्नागिरी पोलिसांनी अल्पवयीन मुलामुलीला घेतले ताब्यात

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : बाहेर जातो, असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या रत्नागिरी शहरातील अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पंढरपूर येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत सांगलीतील एक अल्पवयीन मुलगीही असल्याचे पोलिसांना दिसले. तिलाही रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात नेण्यात आले.

बेपत्ता झालेल्या मुलाबाबत रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात पळवून नेल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांना तांत्रिक माहितीच्या व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा मुलगा पंढरपूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शहर पोलिस स्थानकातील गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाने तिथे जाऊन शनिवारी त्याला ताब्यात घेतले. पंढरपूर येथे पोलिसांचे पथक गेल्यानंतर त्याठिकाणी त्या मुलासोबत सांगली येथील एक अल्पवयीन मुलगीही होती. तिलाही पोलिसांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात नेले आहे.

सांगली येथील अल्पवयीन मुलगीही घरातून निघून गेली होती. याबाबत तिच्या नातेवाईकांनी गांधीनगर पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार दिली होती. तिचा सांगली पोलिस शोध घेत होते. बेपत्ता अल्पवयीन मुलाला शोधून आणल्यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी पोलिस अधिकाऱ्यांना १,५०० रुपये रिवॉर्ड व पोलिस अंमलदारांना ५०० रुपयांचा रिवार्ड आणि प्रमाणपत्र दिले.

ही कामगिरी रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले, पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास जाधव, प्रसाद घोसाळे, पोलीस नाईक वैभव नार्वेकर, अमित पालवे, चालक विशाल आलीम यांनी केली. रत्नागिरीतील अल्पवयीन मुलगा काही महिने शिक्षणासाठी सांगलीत होता. यावेळी त्याची सांगलीतील मुलीशी ओळख झाली होती. पुढे हा मुलगा परत रत्नागिरीत आल्यावरही दोघे जण एकमेकांच्या संपर्कात होते. हा मुलगा काही दिवसापूर्वी सांगलीत जाऊन त्या मुलीला भेटून ते दोघे जण पंढरपूर येथे होते. याठिकाणी रत्नागिरी पोलिसाना त्याचे लोकेशन मिळाल्यावर त्या दोघांना पोलिसानी रत्नागिरीत नेले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या