23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeसोलापूरदूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन

दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन

एकमत ऑनलाईन

अकलुज : दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने रस्त्यावर ते दूध ओतून सरकार विरोधात घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले आज दुधाचे दर अठरा ते वीस रुपये वर आले आहेत हमीभाव सुद्धा मिळत नाही अशी अवस्था दूध उत्पादक शेतक-यांची झाली आहे सरकार दूध उत्पादकांकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही करोनाचे भूत शेतक-यांच्या मानगुटीवर ती बसवुन शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान राज्यकर्ते करत आहे उसाप्रमाणे दुधाला पण एफआरपी असावी जर सरकारने तातडीने दूध दरवाढ नाही केली तर पशुधन वाचणार नाही कारण पाण्याची बाटली वीस रुपये आणि दुधाला दर 18 रुपये पाण्यापेक्षा दूध स्वस्त झाले राज्यात अनेक ठिकाणी प्रतिलिटर दहा रूपये दराने कमी भाव मिळत आहे राज्य सरकारने परिपत्रक काढून ही खासगी व सहकारी दूध संघांकडून त्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे जर सरकारने तातडीने दूध दरवाढ नाही केली तर बेमुदत बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा रयतक्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बिडवे यांनी दिला.

एकीकडे राज्य सरकारच्या आदेशाचा भंग होत आहे मात्र दुसरीकडे दुधाला कमी भाव देणा-या दूध संघांवर कारवाई करण्याचे धाडस दुग्धविकास विभागाकडून होत नाही इतकेच नाही तर दूध संघावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे राज्यामध्ये दूध उद्योगाची उलाढाल सुमारे शंभर कोटी रुपयांचे आहे तर दूध उत्पादक 1 कोटी 20 लाख सरासरी आहेत दूध व्यवसाय तेजीत असला कि दूध कंपन्या चांगला भाव देतात मात्र मंदीच्या काळात शेतक-यांना वा-यावर सोडतात पशुखाद्यासाठी येणारा खर्च वाढला सरकी,गोळी,भुसा,ताम,मक्याचा भरडा ,ओलाचारा यांचे भाव गगनाला भिडले असताना दूध संघांनी मात्र 18 रुपये वर दुधाचे भाव आणलेत आज शेतकरी मेटाकुटीला आला आहे जर दरवाढ नाही झाली तर पशुधन वाचणार नाही सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातला दूध उत्पादक शेतकरी आज रस्त्यावरती उत्तरला आहे दुधदरवाड नाही केली तर राज्यात एकाही मंर्त्याला फिरकु देणार नाही असा ईशारा रयत क्रांती संघटनेचे राहुल बिडवे यांनी दिला यावेळी सनी पाटील,बापु रेडे,कुणाल निबाळकर,लखन गरड,डॉ सचिन नलवडे,निलेश काटे उपस्थित होते.

कोरोनाच्या मृत्यूदराने प्रशासनाची चिंता वाढली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या