33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeसोलापूरमोहोळच्या व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा देत नियमित दुकाने सुरु

मोहोळच्या व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा देत नियमित दुकाने सुरु

एकमत ऑनलाईन

मोहोळ (राजेश शिंदे) : सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे मोहोळ शहर यापुढे बंद न ठेवता निवेदन , निषेध आदीच्या मार्गाने सर्वसंमतीने पाठिंबा द्यावा , अशा प्रकारे ठरलेल्या बैठकीतील निर्णयाची आठवण करून देत , शेतकऱ्यांच्या मागणीस पाठिंबा देण्यासंदर्भात निवेदन देऊन , आपली दुकाने उघडावीत , असे सर्व सहमतीने ठरविण्यात आले . त्याप्रमाणे मंगळवारी ( ता .८ ) नेहमीप्रमाणे छोट्या – मोठ्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने रोजच्याप्रमाणे उघडली आहेत .

दिल्ली येथे शेतीविषयक मागण्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या सुरू असलेल्या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा दर्शवत आज ( मंगळवार ) संपूर्ण भारत बंदमध्ये दुकाने बंद न करता नैतिकतेने बळिराजाच्या मागण्यांना पाठिंबा असल्याची भूमिका नागनाथ टपरीधारक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे .शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता म्हणून शेतकरी संघटनांनी मंगळवारी त्या संदर्भात मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये तालुक्याचे आमदार यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत , कॉंग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेनेच्या प्रमुख नेते, नागनाथ टपरीधारक संघटनेचे अध्यक्ष दत्ता (महाराज )पुराणिक, उपाध्यक्ष अतुल गावडे ,सचिव राजेश शिंदे आधी पदाधिकार्‍यांसह बैठक झाली.

या बैठकीमध्ये यापूर्वी सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे मोहोळ शहर यापुढे बंद न ठेवता निवेदन , निषेध आदीच्या मार्गाने सर्वसंमतीने पाठिंबा द्यावा , अशा प्रकारे ठरलेल्या बैठकीतील निर्णयाची आठवण करून देत , शेतकऱ्यांच्या मागणीस पाठिंबा देण्यासंदर्भात निवेदन देऊन , आपली दुकाने उघडावीत , असे सर्व सहमतीने ठरविण्यात आले . त्याप्रमाणे मंगळवारी ( ता.८) नेहमीप्रमाणे छोट्या – मोठ्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने रोजच्याप्रमाणे उघडली आहेत. बंद काळात कुठेही अनुचित घटना घडणार नाही यासाठी मोहोळचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर सह इतर स्टॉप ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

जिल्हा परिषद सीईओ पृथ्वीराज यांची लातूर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या