27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूर१४ कुटुंबांचे पुनर्वसन; देगाव जलसेतूमधील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

१४ कुटुंबांचे पुनर्वसन; देगाव जलसेतूमधील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
देगाव जलसेतू येथील अतिक्रमणग्रस्त 14 कुटुंबांचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नामुळे पुनर्वसन झाले तसेच या भागातील सुमारे पंधरा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखालीही आले आहे. सोलापूर मंगळवेढा रोड वरील देगाव जलसेतू खालील किलोमीटर चार आणि पाच मध्ये अतिक्रमण होते. त्यामध्ये 14 कुटुंब राहत होते. त्यामुळे पुढील काम रखडले होते त्या कुटुंबांना तेथून काढून त्यांचे पुनर्वसन करणे जिकरीचे होते. अतिक्रमण विभागाच्या पथकाने अनेक वेळा प्रयत्न केले होते मात्र त्यांना यश आले नव्हते. शेवटी यात आमदार सुभाष देशमुख यांनी लक्ष घातले.

आ. देशमुख यांनी त्यांची समजूतही घातली. मात्र येथून जागा सोडल्यास जायचे कुठे असा प्रश्न त्यांच्या समोर होता. शेवटी आमदार सुभाष देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग योजनेच्या स्कीममधून त्या 14 कुटुंबांना 300 स्क्वेअर फुट सदनिकेच्या रेट प्रमाणे प्रत्येकी चार लाख 95 हजार रुपये घराचा मोबदला मिळवून देत 14 कुटुंबांचे पुनर्वसन केले. अकरा कुटुंबांना यापूर्वीच पैसे देण्यात आले आहेत तर उर्वरित तीन कुटुंबांच्या अनुदानास फिक्स मंजुरी मिळाली आहे तेही लवकरच देण्यात येणार आहेत. आमदार सुभाष देशमुख यांच्या या प्रयत्नामुळे देगाव जलसेतू खालील 15 हजार हेक्टर क्षेत्रही ओलिताखाली आहे आले. आहे त्या 14 कुटुंबांनी आमदार सुभाष देशमुख यांचे आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या