23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसोलापूरबार्शीत सेवानिवृत्त शिक्षिकेला गंडविले, दोघांविरुद्ध गुन्हा

बार्शीत सेवानिवृत्त शिक्षिकेला गंडविले, दोघांविरुद्ध गुन्हा

एकमत ऑनलाईन

बार्शी : घराबाहेर साप निघाला आहे सांगत अनोळखी दोघे जण सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरात शिरले. गोड बोलत तिच्या गळ्यातील सोन्याची माळ आईला करावयाची आहे. फोटो काढेपर्यंत दाखवा, म्हणत हातचलाखी करून दीड लाखांची साडेतीन तोळ्यांची माळ पळविल्याचा प्रकार बार्शी शहरात कुर्डुवाडी रस्त्यावर अध्यापक कॉलनीत २७ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडला.

याबाबत सेवानिवृत्त शिक्षिका पुष्पलता शरद गोवर्धन (७५, रा. अध्यापक कॉलनी) यांनी बार्शी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार बुधवारी सायंकाळी दोन अनोळखी व्यक्ती साप निघाला. साप निघाला. म्हणत गोवर्धन यांच्या घरासमोर आले.

गोवर्धन यांनी कुठे आहे साप म्हणताच कुठे गेला माहिती नाही म्हणत ते दोघे घरात शिरले. त्यांनी साप शोधण्याचा बहाणा केला. त्यानंतर ते त्या महिलेशी गोड बोलून गप्पा मारू लागले. त्या दोघांपैकी एकाने तिला तुमच्या गळ्यातील सोन्याची माळ माझ्या आईला करावयाची आहे म्हणत फोटो काढण्यासाठी घेतले. तिला बोलण्यात गुंतवून एकाने सोन्याची माळ घेऊन गादीवर ठेवली, तर दुसऱ्याने तिला बोलण्यात गुंतवून ती माळ घेऊन बाहेर गेला. दरम्यान वृद्ध शिक्षिकेने आरडाओरड केला अन् दोघे दुचाकीवर बसून पळाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गोवर्धन यांनी पोलीस ठाणे गाठले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या