शनिवारी १७ कोरोना रुग्ण वाढले >> एकूण ३६४ कोरोनाबाधित रुग्ण >> ३७ जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी / सोलापूर :
शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार सोलापुरात २१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सोलापुरातील एकूण रुग्णांची संख्या ३६४ झाली आहे. शनिवारी २३४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २१३ निगेटीव्ह तर २१ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. त्यात नऊ पुरुष आणि बारा महिलांचा समावेश आहे. शनिवारी एकही मृत नोंद नाही.
आत्तापर्यंत ४१०६ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यापैकी ते ३४५६ निगेटिव्ह तर ३६४ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आतापर्यंत एकूण 24 जणांचा मृत्यू झालाय तर १५० जण बरे झाले आहेत . तर केगाव येथून ९० जणांना क्वॉरंटाईन मधून सोडण्यात आले़ शुक्रवार पेठ, अशोक चौक, अलकुंठे चौक, जुना कुंभारी नाका, लष्कर, न्यु पाच्छा पेठ, कुमठा नाका, गिता नगर, एकता नगर, साईबाबा चौक, तुळशी नगर, नाथ संकुल, सदर बझार आदी परिसरातुन बाधीत व्यक्ती सापडल्या आहेत.
Read More औरंगाबादेत कोरोनाचा उद्रेक 58 नव्या रुग्णांसह, रुग्णसंख्या 900 वर
कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसराचे जीआयएस मॅपिंग तयार करून पाठविण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी महापालिकेस दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत 65 प्रतिबंधित परिसराचे मॅपिंग तयार झाले असून, उर्वरित परिसराचे मॅपिंग तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जीआयएस मॅपिंगमुळे राज्यातील निर्णयक्षम यंत्रणेला जागेवर बसून परिसरातील स्थिती पाहता येणार आहे.
जीआयएस मॅपिंगमध्ये प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसरात किती लोकसंख्या आहे, या परिसरात कोणती दुकाने, व्यावसायिक संस्था आहेत, जीवनावश्यक साहित्याची किती दुकाने आहेत याचीही माहिती दिली जाणार आहे. रुग्ण आढळलेल्या व्यक्तीच्या घरापासून किती क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आला आहे याचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या आधारे हा परिसर किती दिवस प्रतिबंधित ठेवायचा याबाबतचा निर्णय घेण्यासही मदत होणार आहे.
सोलापूर पोलिस आयुक्तालयाने शुक्रवारपर्यंत 78 ठिकाणचे परिसर प्रतिबंधित म्हणून जाहीर केले आहेत. त्यापैकी महापालिकेने आतापर्यंत 65 ठिकाणचे मॅपिंग तयार केले आहे. महापालिकेच्या संगणक विभागामार्फत हे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. मॅपिंगद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे लॉकडाऊनच्या कालावधीत कोणत्या व्यवसायाला परवानगी द्यायची किंवा कायम ठेवायची याचाही निर्णय घेण्यास मदत होणार आहे.