25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसोलापूरपंढरपूर-मंगळवेढा रोडवर रास्ता रोको

पंढरपूर-मंगळवेढा रोडवर रास्ता रोको

एकमत ऑनलाईन

पंढरपूर (प्रतिनिधी) : बारामती, इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातून सुमारे ५ टीएमसी पाणी लाकडी- ल्ािंबोडी योजनेस देण्याचा घाट घालून शासनाने निधी मंजूर केल्याने स्वभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मंगळवारी पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील अनवली या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उजनी धरणावरील लाकडी निंबोणी योजना स्थगित करण्यात यावी. अन्यथा नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीच्या वतीने देण्यात आला.

सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,जलसंपदामंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनास देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, तानाजी बागल, रणजीत बागल, सचिन अटकळे, बाहुबली सावळे, शहाजान शेख तसेच पंढरपूर तालुक्यातील शेतकरी उपस्थितीत होते. रास्ता रोको आंदोलन तब्बल १ तास सुरू असल्याने वाहतूक खोळंबली होती.

काही दिवसांपूर्वी शासनाने उजनी धरणावरील लाकडी न्ािंबोणी योजनेस निधी मंजूर केल्याने सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केला जात असल्याची भावना शेतक-यांमधून व्यक्त केली जात आहे. याबाबत अनेक राजकीय पक्ष व संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता पाणी प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून आली आहे.

उजनी धरणावरील लाकडी निंबोणी योजना तात्काळ स्थगित करण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील अनवली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनामध्ये उजनी धरणाचे लवादाने पाणी वाटप पूर्ण केलेले असताना नवीन योजना कशी आणली? भीमा नदीवर एक मोटर बसवायला पाणी परवाना मिळत नाही मग तुम्हाला नव्वद अब्ज घनफूट पाणी कसे काय मिळते? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पालक या शब्दाचा अर्थच पालकमंत्र्यांना कळलेला दिसत नाही. कुंपणच शेत खात आहे, शेतकरी भावांनो आता आपल्यालाच हे कुंपण उखडून फेकून द्यावे लागेल. कुणीही उठतो आणि उजनीच्या पाण्यावर डल्ला मारतो. मुग गिळून गप्प बसणार का ? आमच्या हक्कावर जर कोण गदा आणत असेल आमचे पाणी चोरून आमचा भविष्यकाळ उद्धस्त करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, हे ध्यानात ठेवा.

रक्ताचे पाट वाहतील पण पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही. भीमा काठच्या शेतक-यांच्या संयमाचा अंत बघू नका. आमचा संयम सुटला तर तुम्हाला उद्धवस्त केल्याशिवाय सोडणार नाही. आधी उजनी धरण प्रकल्पावरील चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या पंढरपूर मोहोळ मंगळवेढा पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्ण करा. पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी तुम्हाला २०१२ मध्ये बारामतीमध्ये येऊन वाकवले आहे. आता आमच्या पाण्याकडे वाकडी नजर कराल तर परत आम्हाला बारामतीकडे कुच करावी लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
सुमारे १ तास सुरू असलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळाल्य. वाहतूक खोळंबली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या