27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeसोलापूरघरी जेवणाचे आमंत्रण देऊन शिक्षकाला लुटले

घरी जेवणाचे आमंत्रण देऊन शिक्षकाला लुटले

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सर, मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही मला खूप मदत केली आहे. माझ्या घरी जेवण करण्यासाठी चला असे म्हणून अज्ञात व्यक्तीने वृद्ध शिक्षकाच्या जवळील मोबाईल, पाच हजाराची रोख रक्कम व मोटारसायकल पळवून नेली. हा प्रकार दि. ११ जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला.

इक्बाल नजीर मोहम्मद शेख (वय ७१, रा. ओंकार हौसिंग सोसायटी बिल्डिंग नं. १, दुसरा मजला एस. १ गैबीपीर दर्गाहच्या समोर, होटगी रोड सोलापूर) हे मार्कंडेय रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. मात्र, तेथे गर्दी होती. त्यामुळे ते बाहेर आले व साई मंदिराजवळ सिगारेट पित थांबले. तेव्हा एक २५ ते ३० वयोगटातील तरुण तेथे आला. तुमचे नाव इकबाल सर आहे ना? मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही बऱ्याच वेळा मला मदत केली आहे. सर, तुम्ही फार दिवसांनंतर मला भेटला आहात, माझ्या घरी जेवायला चला, असे निमंत्रण दिले. इक्बाल शेख यांना विश्वास बसला. त्यामुळे ते जेवणासाठी घरी जाण्यास तयार झाले.

तरुण त्यांच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसला व त्यांना पाथरूट चौक येथे नेले. तेथे जमलेल्या गर्दीत मोटारसायकल थांबवण्यास सांगितले. माझ्या घरी लग्नाचा कार्यक्रम आहे. मला खूप अडचण आहे सर. पाच हजार रुपये द्या, असे म्हणाला. इक्बाल शेख यांनी पाच हजार रुपये दिले. त्यानंतर त्याने पत्नीला फोन लावतो असे सांगून मोबाईल घेतला. घरी जाऊन येतो म्हणून मोटारसायकलही घेतली व तेथून पोबारा केला.

इक्बाल शेख हे खासगी ट्युशन घेत होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे शिकून गेले आहेत. अज्ञात तरुण हा देखील एक आपला विद्यार्थी असावा, असा समज करून त्याच्यावर विश्वास ठेवला होता. खूप आग्रह करु लागल्यामुळे त्याच्यासोबत घरी जाण्यास तयार झाले. मात्र त्यांची फसवणूक झाली.घटनेची फिर्याद जेलरोड पोलिस ठाण्यात दीली असून अज्ञात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या