32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home सोलापूर लग्नाच्या नावाखाली लुटणारी टोळी अटकेत

लग्नाच्या नावाखाली लुटणारी टोळी अटकेत

एकमत ऑनलाईन

सोलापूर : लग्न करण्याची बतावणी करून नवरदेव व त्याच्या कुटूंबियांकडून आर्थिक तसेच दागिने घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार उजेडात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार अंकुश नामदेव ढसाळ वय-४२, रामुपो. आसवली, ता. खंडाळ, जि. सातारा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ सचिन ढमाळ याच्या लग्नाकरिता मुलीचे लग्न पाहणे चालू असताना त्यांचा नातेवाईक लालासो सदाशिव पवार यांना साधारण दहा दिवसापूर्वी अंकुश ढसाळ यांनी समक्ष भेटून मावसभाऊ सचिन याच्याकरिता स्थळ पाहण्यास सांगितले असता लालासो पवार यांनी धनाजी अमृत पाटील, रामुपो चमकेरी, ता. आखणी, जि. बेळगाव , कर्नाटक यांना फोनवर संपर्क साधुन सचिन याच्याकरिता मुलगी पाहण्यास सांगितले.

त्यानंतर लालासो पवार व धनाजी पाटील यांनी मिळून दिपा संतोष जाधव, रा. लिमयेवाडी सोलापूर, पुजा ईश्वर उपाध्ये, अनमोल विशाल शिकाटोलू, सचिन पांडव, बापूराव ढवळे, बिराजदार मावशी व ज्योत्स्ना यांनी मिळून संगनमत करून फिर्यादी अंकुश ढसाळ यांचा मावसभाऊ सचिन याचे लग्न लावून देतो म्हणून विडी घरकुल एफ ग्रुप सोलापूर येथील एका घरात खोटया नावाची मुलगी व तिचे नातेवाईक उभे करून लग्न केल्याचे भासवून रोख रक्कम १ लाख ६० हजार रूपये घेऊन तसेच वधुकरिता सोन्याचे मणी, मंगळसुत्र, पायातील चांदीचे पैंजण, जोडवे, बिछवे असे १८हजार रूपयाचे दागिने असे एकुण १ लाख ७८ हजार रूपयाची फसवणूक करून वधु मुलगी नांदायला पाहिेजे असेल तर आणखीन १००००० रूपये द्या नाहीतर तुमच्या विरूध्द पोलिसात फिर्याद दाखल करते अशी धमकी देवून खंडणी मागीतली अशा आशयाची फिर्याद अंकुश ढसाळ यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दिली.

त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सपोनि निलकंठ राठोड यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी आरोपी लालासो पवार, धनाजी पाटील, दिपा जाधव, पुजा उपाध्ये, अन्नु शिकाटोलू यांना अटक करून त्यांच्याकडून १ लाख रूपये सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले. २२ फेब्रुवारीपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलकंठ राठोड, सपोनि खांडेकर, पोनि बजरंग बाडीवाले, पोहेकॉ ताजोद्दीन शेख यांनी केली.

 

पावणेपाच लाखांचा गुटखा जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या