27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरहॉस्पीटलमधून ४७ हजारांचा ऐवज लंपास

हॉस्पीटलमधून ४७ हजारांचा ऐवज लंपास

एकमत ऑनलाईन

सोलापूर : पंढरपूर येथील रहिवासी महिलेला मुतखड्याचा त्रास होऊ लागला. त्यावर उपचार घेण्यासाठी सोलापूर सात रस्ता येथील चितळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या खोलीतून रुग्ण महिलेच्या पतीचे रोख रक्कम आणि मोबाइल असा ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. सदर बजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळकृष्ण दिगंबर सूर्यवंशी (वय २९, रा. अनवली, पंढरपूर) हे ७ जून रोजी पत्नीला घेऊन चितळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. पत्नीचे ऑपरेशन करण्याचे ठरले होते. सात तारखेला दाखल झाल्यानंतर आठ तारखेला चोरांनी हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर पाठीमागून येऊन रूममध्ये प्रवेश करून टेबलावर ठेवलेले दोन मोबाइल, खुंटीवर अडकवलेल्या पॅन्ट खिशातून रोख रक्कम असा ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याबाबत बाळकृष्ण सूर्यवंशी यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल नदाफ हे करीत आहेत. पोलिसांनी या हॉस्पिटलचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. चोर पाठीमागून दुसऱ्या मजल्यापर्यंत कसा चढून गेला, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या