22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeसोलापूरओटीपी क्रमांक न सांगताही खात्यातून गेले ७० हजार रुपये

ओटीपी क्रमांक न सांगताही खात्यातून गेले ७० हजार रुपये

एकमत ऑनलाईन

सोलापूर : ओटीपी क्रमांकाचा ना संदेश आला ना तो क्रमांक सांगितला. असे असतानाही अंबादास शिवराया वाघमारे (वय ३७, रा. गुरुदत्त नगर, जुळे सोलापूर) यांच्या बँक खात्यातून ६९ हजार ११५ रुपये गेले.

वाघमारे यांच्या मोबाईलवर ३० मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या खात्यातून ६३ हजार ९९७ रुपये ट्रांजेक्शन झाल्याचा संदेश आला. त्यानंतर लगेच ५ हजार ११८ रुपयांचे दुसरे ट्रांजेक्शन झाल्याचाही त्यांना संदेश आला. पण या संदेशापूर्वी कोणताही ओटीपी आला नाही तरी त्यांच्या खात्यातून ६९ हजार ११५ रुपये अज्ञात इसमाने आपल्या खात्यातून ऑनलाईन काढून घेत आपली फसवणूक झाल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीसात वाघमारे यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाल आहे. घटनेचा तपास पोसई मुलाणी करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या