बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनतेच्या झोपडी,पत्रा शेड,दगडी बांधकाम,तसेच बाजारपेठीतील व्यापाऱ्यांच्या गळ्यात पाणी शिरल्याने खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.त्यामुळे राष्ट्रवादीच्या बार्शीतील टीमने रूपाली चाकणकर यांना पाहणी दौरा करण्याची विनंती केली.त्यामुळे दि.१९ सप्टेंबर रोजी चाकणकर यांनी पाहणी केली.
चाकणकर यांनी सुरवातीला बार्शी शहर आणि नंतर ग्रामीण भागाची पाहणी केली.यावेळी त्यांनी बार्शी शहरात मंगळवार पेठ,गणेश तलाव,राणा कॉलोनी,भवानी पेठ,पारधी कॅम्प या ठिकाणी पाहणी करीत स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला.तसेच बार्शी नगरपालिकेलाही भेट देऊन प्रशासनाशी चर्चा करून नुकसान भरपाई विषयी चर्चा करण्यात आली.त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते विक्रम सावळे यांच्या सावळे सभागृहात बैठक घेऊन ग्रामीण भागाची परस्थितीची विचारपूस करून चाकणकर यांनी ग्रामीण भागाचाही दौरा यावेळी केला.तसेच पाण्यात अडकलेल्या नागरिकांना एस.टी.बसमधून सुरक्षित बाहेर काढून त्यांना सुखरूप घरी पोहोच केल्यामुळे छत्रपती ग्रुप आणि अध्यक्ष आणि त्यांच्या टीमचे यावेळी अभिनंदन करून त्यांचा सत्कारही केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांच्या दौऱ्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष जयमालाताई गायकवाड,प्रदेश सरचिटणीस सुवर्णा बागल,जिल्हा निरीक्षक दिपाली पांढरे,ओबीसी जिल्हाध्यक्ष साधना राऊत.जिल्हा उपाध्यक्ष अनिता नागणे,तालुकाध्यक्ष सुप्रिया गुंडपाटील,शामल, काशिद ,रेखा तुपे,तालुका कार्याध्यक्ष दैवशाला जाधवर,शहराध्यक्ष वृषाली वाघमारे,संगिता वडे,साखरबाई चौधरी महिला तर राष्ट्रवादीचे उपसरपंच महेश चव्हाण,निरंजन भुमकर,अॅड.हर्षवर्धन बोधले,अमोल कुदळे,ईब्रहीम शेख,उमेश नेवाळे,अभिजित जाधवर,रत्नदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते