23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeसोलापूरजुळे सोलापूर रोटरी क्लबच्या माध्यमातून सचिन चौधरी यांचे लक्षवेधी कार्य

जुळे सोलापूर रोटरी क्लबच्या माध्यमातून सचिन चौधरी यांचे लक्षवेधी कार्य

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सामाजिक कार्याचा ठसा सदैव अंगिकारून सर्व सामाजिक घटकांसाठी काम करण्याचे व्रत सचिन चौधरी यांनी घेतले. आणि यातून सामाजिक कार्याचा डोंगर उभा राहिला. लक्ष्मीनारायण थिएटर समोरील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेत सचिन चौधरी गेल्या २४ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ज्ञानदानाचे काम करतानाच सामाजिक कार्याची आवड असल्याने सचिन चौधरी यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतला.

फोटोग्राफर वेल्फेअर असोसिएशन होटगी रोड सोशल फाऊंडेशन, नाभिक एकता मंच, युवक शिक्षक कर्मचारी संघटना, साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची पतसंस्था अशा अनेक संघटनांमध्ये कार्य करत सचिन चौधरी यांनी सामाजिक कार्याचे व्रत अंगिकारले. २०२० साली त्यांची रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून चौधरी यांनी रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरला वेगळे स्थान मिळवून दिले. कोरोना महामारी काळात निरनिराळ्या व्याख्यानाचे आयोजन त्यांनी केले. १ जुलै रोजी चार्टर्ड अकौंटटचा सत्कार त्यांनी सीए दिनानिमित्त केला. कोविड काळात चांगले काम केलेल्या डॉक्टरांनाही सन्मानित करण्यात आले. शिक्षणतज्ज्ञ ए.डी. जोशी यांचे लॉकडाऊन काळातील बदलते शिक्षण प्रवाहया विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. या बरोबरच डॉ. प्रदीप आवटे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, यांचे कोरोना नियंत्रण व प्र्रत्येकाची जबाबदारी आणि ऑनलाईन शिक्षण डोळ्याचे रक्षण’ या विषयांवर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले.

शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही कसे व्हावे, या विषयावर स्वाती हेरकर यांनी ऑनलाईन कार्यशाळेत मार्गदर्शन केले. अभिनेता संजय खापरे, लोकशाहीर संभाजी भगत, हास्यसम्राट दीपक देशपांडे यांचा गप्पा सोलापुरी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पोकन इंग्लिश एच. मंगेश या मुंबईतील तज्ज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन पार पडले. दहावीतील विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ शिक्षकांच्या व्याख्यानमालेचेही आयोजन जुळे सोलापूर रोटरी क्लबतर्फे करण्यात आले. नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा कोविड काळातील कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. कोंतम चौकातील बॉईस हॉस्टेलला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशिन देण्यात आले. डोणगांव येथील भाटेवाडीच्या फडतरे गुरुंजीच्या शाळेला पत्रे देण्यात आले. मूकबधीर शाळेत सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. हास्यकवी संमेलनाचेही आयोजन करण्यात आले. जुळे सोलापुरात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात ३७ संघांचा सहभाग होता.

गुरुकुल कॉम्प्युटरतर्फे मोफत संगणक प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात आले. दिव्यांगांना जयपूर फूट व कृत्रिम हात वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले. छोट्या व्यावसायिकांना आर्यनंदी पतसंस्थेच्या माध्यमातून बिनव्याजी दहा हजार रुपये २० व्यावसायिकांना दिले. लहान मुलांचे दुंभगलेले ओठ व टाळूच्या १२ जणांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कोरोनाबाधित शिक्षकांसाठी राखीव बेडची सोयही करण्यात आली. शिक्षकांसाठी तंत्रस्नेही कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात ६ हजार ८०० शिक्षकांनी सहभाग घेतला.

सचिन चौधरी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरने लक्षवेधी कार्य केले. याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या अध्यक्षपदी सचिन चौधरी यांची पुनश्च: निवड करण्यात आली. दर बुधवारी रोटरी सदस्यांची बैठक होते. त्यामध्ये कार्यक्रमाची रुपरेषा ठरते. व त्याप्रमाणे विविध कार्यक्रम पार पडतात, असे सचिन चौधरी यांनी सांगितले. या सर्व कार्यक्रमांसाठी डॉ. सुरेश व्यवहार, आनंद कुलकर्णी, जयश्री चव्हाण, संजय अजनसोंडकर व अतुल चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रीहरी वडनाल, नटराज कांबळे, अवधुत सुर्डीकर यांनी बहुमोल सहकार्य केले.या बरोबरच सचिव माऊली झांबरे यांचीही प्रत्येक कार्यात साथ असते. माजी प्रांतपाल विष्णू मोंढे, व्यंकटेश चन्ना, भावी प्रांतपाल स्वाती हेरकल, केदार कहाते, जयेश पटेल, डॉ. राजीव प्रधान यांचे कायम मार्गदर्शन असते, असेही सचिन चौधरी यांनी सांगितले. पुन्हा संधी मिळाल्याने जुळे सोलापुरात रोटरीच्या माध्यमातून वेगळे आणि चांगला काम करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्र्यांना विश्वासात न घेताच आयुक्तांची बदली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या