21.1 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home सोलापूर सदाभाऊ फालतू आणि भामटा

सदाभाऊ फालतू आणि भामटा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : माजी मंत्री सदाभाऊ खोत फालतू आणि भामटे आहेत. अशा लोकांना आम्ही जवळ करत नसल्याचे खोचक टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतक-यांचे आंदोलन करण्यात आले.

दूध दरवाढीच्या विषयावर शेट्टी यांनी सोमवारी सोलापुरात आंदोलन केले. चार हुतात्मा पुतळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत त्यांनी मोर्चा काढला. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडविले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील एक कोटी १९ लाख लिटरपैकी तब्बल ५२ लाख लिटर दूध शिल्लक राहात आहे. पाणी बाटलीस २० रुपयांचा दर असतानाही दूधाला प्रतिलिटर १७ रुपयांचा भाव मिळत आहे.

हॉटेल, चहा कॅन्टीन, शीतपेय विक्री बंद असल्याने अतिरिक्त दुधाचे प्रमाण वाढले आहे. उत्पादन खर्च अधिक असतानाही बळीराजाला अपेक्षित दर मिळत नाही. २१ जुलैला लाक्षणिक संप करून राज्य सरकारला तोडगा काढण्याची विनंती केली होती. ५ ऑगस्टपर्यंत निर्णय घेऊ, असे आश्वासन देऊनही सरकारने काहीच तोडगा काढला नाही. त्यामुळे परवानगी मिळत नसतानाही राज्यभर आंदोलने केली जात आहेत. दरम्यान केंद्र सरकारने दूध भुकटी आयातीचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा, दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी बंद करावी, भुकटीसाठी निर्यात अनुदान द्यावे, अशा मागण्या शेट्टी यांनी मोदी सरकारकडे केल्या.

वीज बिल विरोधात वंचितचे आंदोलन
वंचित बहुजन आघाडी सोलापूरच्यावतीने आज सकाळी वीज बिल माफकरा मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. लॉकडाऊन काळात आलेली भरमसाठ बिलं नागरिक तसेच छोट्या व्यापा-यांना परवडणारी नाहीत. अव्वाच्या सव्वा बिलं वीज मंंडळाने पाठविली ती माफ करावी असं आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी केली. यावेळी विजबिलांच दहनही करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी ‘छावा’चे आंदोलन
मराठा समाजाच्या विविध न्यायीक मागण्यासाठी आज मराठा समन्वय समिती व छावा क्रांतीकारी सेना यांच्यावतीनं आंदोलन करण्यात येत आहे. जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी आंदोलन पार पडले. मराठा आरक्षण उपसमितीवरुन अशोक चव्हाण यांना हटवावं. आरक्षणासाठी विधीमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन घ्यावं. सुप्रिम कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी न घेता कोर्ट सुरु होईल तेंव्हा सुनावणी व्हावी. ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण दिलेल्या सव याचिका एकत्रीत चालवाव्यात अशा १५ वर मागण्या आहेत. जिल्हा संपर्क प्रमुख नागेश पवार तसेच किरण बागुल, कुंदन ताकमोगे, गणेश साठे, स्वप्नील तोडकरी यांच्यासह दोन्ही संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समाजाला गरज : खा. राजेनिंबाळकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या