सांगोला : सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर पाणी भरण्यासाठी गेल्यावर पत्नीला शिवीगाळ व दमदाटी का करता म्हणून जाब विचारणा-या पतीला सख्ख्या भावासह पुतण्या, भावजई, पुतणी यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मुलगा आला असता त्यालाही पुतण्याने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.
ही घटना१० मे रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास वाणीचिंचाळे (ता. सांगोला) येथे घडली. याबाबत अशोक सखाराम येजगर यांनी फिर्याद दिली असून सांगोला पोलिसांनी शिवाजी येजगर, अनिकेत येजगर, तायडाबाई येजगर, सोनाली जुजारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला
अशोक येजगर व शिवाजी येजगर हे सख्खे भाऊ एकमेकाच्या शेजारी राहातात. शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अशोक येजगर यांची पत्नी सुनंदा या सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर नळाला पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी भाऊ शिवाजी येजगर, पुतण्या अनिकेत येजगर, भावजई तायडाबाई येजगर व पुतणी सोनाली जुजारे यांनी सुनंदा यांना तू नळाला पाणी भरायचे नाही म्हणत दमदाटी सुरू केली. तसेच शिवीगाळ केल्याचा जाब विचारणारे अशोक येजगर व मुलगा राहुल यांना लाकडी काठीने व हाताने मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून शेजारील तातोबा येजगर व भानुदास येजगर यांनी धाव घेऊन भांडण सोडवले.असे फिर्यादीत म्हटले आहे.