22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeसोलापूरहाथरस पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्यागृह...

हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्यागृह आंदोलन

एकमत ऑनलाईन

सोलापूर : हाथरस कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रेलवे स्टेशन येथील पुतळा समोर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांच्या नेतृत्वाखाली सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, नगरसेविका फिरदौस पटेल, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर अलकाताई राठोड, नालिनीताई चंदेले, आरिफ शेख, माजी सभापती देवेंद्र भंडारे, युवक अध्यक्ष, अंबादास करगुळे , सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, vjnt अध्यक्ष युवराज जाधव, संध्याताई काळे, आदिंच्या प्रमुख उपस्थितीत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना संजय हेमगड्डी म्हणाले कि उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पिडितेचा प्रेत परस्पर जाळला पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहे त्यामुळेच आज याठिकाणी सत्याग्रह करण्यात आले.

त्याचप्रामाणे काँग्रेस खा. राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हाथरसला जाताना अडवून धक्काबुक्की करण्यात आली. कार्यकर्त्यांवर लाठिमार करण्यात आला. पत्रकारांनाही पीड़ित कुटुंबियांना भेटायला दिले नाही. आरोपीना पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहेत. बेटी बचाओ चा नारा देणारे मोदी आज मुग गिळून गप्प आहेत उत्तर प्रदेश योगी सरकारच्या हुक़ूमशाही पद्धतिचा, दडपशाहीचा निषेध करत आहोत, भाजपचा हा सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि आरोपींना ताबड़तोब शिक्षा झाली पाहिजे असे विचार संजय हेमगड्डी यांनी व्यक्त केले

सुशांत सिंह प्रकरणात सर्वच शक्यतांचा तपास – सीबीआय

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या