22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeसोलापूरशाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मत्यु

शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मत्यु

एकमत ऑनलाईन

माळीनगर : माळशिरस तालुक्यातील गिरझणी तलावाच्या धबधब्यावर मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या शुभम जठार (रा. शंकरनगर ,गवळीवस्ती) या 18 वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यु झालेची घटना रविवारी ( दि. 24 जुलै) घडली आहे.

सदर घटना अपघात की घातपात याबाबत अजुन स्पष्टीकरण झाले नसले तरी या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे शंकरनगर ( स्वरूपनगर, गवळ वस्ती) येथे राहणारा मुलगा शुभम भारत जठार हा आपल्या मित्रांसोबत गिरझणी येथिल तलावाच्या धबधब्यावर पर्यटनासाठी गेला होता.

धबधब्यात मित्रांसोबत मौज-मजा करत फोटो काढत असताना या दरम्यान शुभम व त्याच्या मित्राचा पाय घसरल्याने दोघेही धबधब्यावरून घसरत धबधब्याच्या पायथ्याशी असणाऱ्या डोहात पडले. तिथे उपस्थित इतराच्या लक्षात येताच त्यांनी डोहाकडे जावून दोघांना बाहेर काढले.

बाहेर काढल्यावर शुभमच्या हालचाली मंदावल्याचे जाणवल्याने त्याला उपचारासाठी हलवले. परंतु शुभमचा मृत्यु झाल्याचे कळाले. घसरून पाण्यात पडलेल्या दोन्ही मुलांना पोहता येत नव्हते, अशी माहिती नातेवाईकांकडून समजली.

या घटनेत मयत झालेला शुभम भारत जठार हा शंकरनगर येथील महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेत 12 वी चे शिक्षण घेत होता. तरुण वयातील मुलांच्या अकस्मात मृत्यूमुळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला तर या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. नातेवाईक व मित्रांनी शुभमच्या मृत्युची खबर अकलूज पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून पुढील कारवाई केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या