29.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home सोलापूर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव 31 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद

जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव 31 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद

एकमत ऑनलाईन

सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) लॉकडाऊनचे निर्बंध 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आले आहेत. या काळात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद, सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, थिअटर्स बंद राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत. यापूर्वी ज्या उपक्रमाला वेळोवेळी सशर्त परवानगी देण्यात आली होती, ते यापूर्वीप्रमाणे लागू राहतील.

कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशाचे पालन करणे आवश्यक असून दोषीविरूद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये चेह-यावर मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी सहा फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे, पाचपेक्षा अधिक ग्राहकांना दुकानात येण्यास परवानगी देऊ नये. मोठ्या सार्वजनिक मेळाव्यावर बंदी असेल. विवाहस्थळी 50 नागरिकांना एकत्र येण्यास परवानगी असेल, अंत्ययात्रेला 20 नागरिकांना एकत्र येऊ शकतील. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास बंदी असून दारू, पान, गुटखा, तंबाखूचे सेवनावर कडक निर्बंध असणार आहेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लातूरात सिंचन विकासाची प्रक्रिया गतिमान होईल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या