23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरदिव्यांग पक्षकारासाठी न्यायाधीशांची संवेदनशीलता

दिव्यांग पक्षकारासाठी न्यायाधीशांची संवेदनशीलता

एकमत ऑनलाईन

सोलापूर : दिवाणी दाव्यावरील सुनावणीसाठी दिव्यांग पक्षकार प्रताप गणपतराव भोसले हे सहा वर्षांपासून न्यायालयात चकरा मारत होते. सुनावणीसाठी त्यांच्या मुलाने त्यांना उचलून न्यायालयात आणले. हे चित्र जिल्हा प्रमुख न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी पाहिले व त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी डायस सोडून त्यांच्या समोर खुर्चीवर बसले आणि पक्षकारांमधील वाद मिटवला. अशी ऐतिहासिक घटना सोलापरातील न्यायालयात घडली. न्यायाधीशांनी पक्षकारासाठी खाली येऊन निर्णय दिल्याची ऐतिहासिक घटना तेथे उपस्थितांनी अनुभवला.

पक्षकार भोसले यांनी दिलेला निर्ण हसत मान्य केले. न्यायाधीश औटी जलदगतीने न्यायदान देण्यात नेहमी आघाडीवर असतात याचिकाकर्ते पक्षकार भोसले हे ऐंशी वर्षांचे आहेत, शिवाय दिव्यांग ही होते. ते संपत्ती वाटणी विषयाकरिता न्यायालयात फिरत होते. त्यांना न्यायालयात उभे राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी स्वतः दिव्यांग असलेले जिल्हा प्रमुख न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी डायस सोडून त्यांच्यासमोर आले. तेथूनच त्यांनी सुनावणी करत निर्णय दिला. त्यांनी दिलेला निर्णय दोन्ही पक्षकारांनी व त्यांच्या वकिलांनी मान्य केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या