22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeसोलापूरबार्शीत विजेच्या धक्क्याने सात जनावरे दगावली

बार्शीत विजेच्या धक्क्याने सात जनावरे दगावली

एकमत ऑनलाईन

बार्शी : बार्शीतील उपळाई रोडच्या बाजूस जवळ लक्ष्याचीवाडी शिवारात चरण्यासाठी सोडलेली सात जनावरे तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीस स्पर्श झाल्याने जागीच ठार झाली. सुदर्शन आदमिले या शेतकर्‍याच्या चार म्हशी, दोन रेड्या व एक गाढव अशी सात जनावरे दगावली. यात पशुपालकाचे सुमारे साडेसहा लाखांचे नुकसान झाले आहे. ही दुर्देवी घटना सोमवारी (दि. २५) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत पाटील यांच्या शेतात जनावरे चरत होती.

दीड महिन्यापूर्वीच विजेचा शॉक बसून मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच विद्युत अपघाताची आणखी एक घटना घडलो आहे. या घटनेमुळे महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी विजेच्या तारा तुटून पडलेल्या असताना सदर विभागाचे काम पाहणान्या वायरमनच्या तारा तुटून पडल्याचे लक्षात कसे आले नाही? असा प्रश्न आहे. दरम्यान संबंधित शेतकर्‍याचे यात साडेसहा लाखांचे नुकसान झाले असून, महावितरणच्या गलथान काभारामुळेच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

पशुपालक सागर ऊर्फ सुदर्शन संजय आदमिले (रा. उपळाई रोड, बार्शी) यांची जनावरे रानात चरण्यासाठी सोडली होती. तेथून एक एलटी लाइन गेलेली आहे. या एलटी लाइनच्या तारा तुटून मागील काही महिन्यापूर्वी जमिनीवर पडल्या होत्या. जमिनीवर तारा तुटून पडलेल्या ठिकाणी जनावरे चरत गेल्याने तारेला जनावरांचा स्पर्श झाला आणि विजेचा जोरदार धक्का बसून सातही जनावरे जागीच ठार झाली. या घटनेनंतर वायरमनने येऊन विद्युत प्रवाह खंडीत केला. घटनास्थळी तालुका पोलिस, महसूल विभागाने पंचनामा केला. तर पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनावरांचे शवविच्छेदन केले.

ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण आडबाजूला व निर्मनुष्य असे आहे. तेथून एलटी लाइन गेली आहे. तिच्या तारा तुटून पडलेल्या आहेत. त्या लाइनवर पुढे एकच कनेक्शन असून, तेही सध्या बंद आहे. त्यामुळेही तुटलेल्या तारांची माहिती मिळू शकली नाही. तुटलेल्या तारांचे निरीक्षण केले असता त्या पूर्ण तुटलेली नसून, काही दिवसांपूर्वी तुटलेल्या आहेत असे दिसून येते. सदर ठिकाणी तार तुटलेली असल्याबद्दल आमच्याकडे तक्रार आलेली नव्हती. चौकशी केली जाईल असे महावितरणचे उपकार्यकारी अभीयंता अरविंद भाग्यवंत यांनी सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या