25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeसोलापूरसत्तर हजाराचा ऐवज पळवला

सत्तर हजाराचा ऐवज पळवला

एकमत ऑनलाईन

सांगोला : चोरट्यांनी दुकानाच्या छतावरील पत्रे उचकटून रोख १५ हजार रुपये आणि ताग्यातील कापड अन साड्यांसह ७० हजारांचा ऐवज पळविला.

मंगळवारी मध्यरात्री ही चोरी झाली असून या घटनेनंतर दुकान मालक सीताराम ज्ञानू पवार यांनी सांगोला पोलिसांत धाव घेतली. सीताराम पवार यांचे वाटंबरे येथे कापड दूकान आहे. ५ जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास कापड दुकान बंद करून ते घरी गेले होते.

दरम्यान, चोरट्यांनी मध्यरात्रीस दुकानाच्या छतावरील पत्रे काढून आत प्रवेश केला. ८० साड्या, सुटिंग शर्टींग ताग्यासह रोख १५ हजार रुपये असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या