सोलापूर : अक्कलकोटचे माजी आमदार श्री सिद्धाराम म्हेत्रे यांना महाराष्ट्रात रिक्त झालेल्या विधानपरिषद जागेवर काँग्रेस आय पक्षाकडून विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेचे प्रवक्ते तथा सातंिलग शटगार व तालुका अध्यक्ष व सोलापूर जिल्यातील काँग्रेस च्या कार्यकर्ते यांनी केली आहे.
महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात काँग्रेस चे एकमेव आमदार म्हणून प्रणितीताई ंिशदे ह्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकटीसाठी व वाढीसाठी सिद्धाराम म्हेत्रे सारख्या नेतृत्वाची गरज आहे….माजी गृहमंत्री श्री सुशीलकुमार ंिशदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट विधानसभा मतदार संघातून चार वेळा निवडून आले आहेत. म्हेत्रे यांनी अक्कलकोट तालुक्याबरोबर जिल्ह्याचाही विकास केलेला आहे.
सिद्धाराम म्हेत्रे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांची सर्वाशी सम्बध चांगले आहेत. त्यांचे वडील सातंिलगप्पा म्हेत्रें हें काँग्रेस पक्षाचे गेल्या 45वर्ष दुधनीचे नगराध्यक्ष पद भूषविलेले आहेत त्यांचा ही जनसम्पर्क दांडगा आहे.. त्यामुळे सिद्धाराम म्हेत्रे साहेबाना संधी दिल्यास सोलापूर जिल्ह्यात नक्कीच काँग्रेस पक्ष वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पक्ष बळकटीबरोबर सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी कार्यकर्तांनी केली आहे.
Read More क्रांतीनगर येथील परिसर सील,प्रशासनाच्या सुचना पाळा : मुन्ना पाटील