26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeसोलापूरपंढरपूर येथे सरकारच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन

पंढरपूर येथे सरकारच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड शिफारसी नुसार मराठा आरक्षण बाबीवर विविध बाजू पडताळून आरक्षण देण्याची गरज नाही, असा धक्कादायक निकाल दिल्याने राज्यातील मराठा समाजामध्ये खळबळ उडाली आहे, याचेच पडसाद पंढरपूरात उमटले. मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने बुधवारी शिवाजी चौक येथे केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आम्ही मंत्री, आमदार, खासदार यांच्या गाड्या फोडू, असा इशारा दिला, आमच्या ५६ मुलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले, अनेक युवक तुरुंगात आहेत,आणि सरकार गप्प आहे,हा आमच्यावर मोठा अन्याय असून आम्ही याला सडेतोड उत्तर देऊ.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप मांडवे, स्वागत कदम,मनसेचे शशिकांत शिंदे, धनंजय मोरे, संतोष कवडे,रामभाऊ गायकवाड तसेच इतर मराठा समाजबांधव उपस्थित होते.यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.राज्य सरकार व आरक्षण उप समितीने वेळकाढू पणा केल्याने आणि मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नसल्याने सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, असा आरोप यावेळी आंदोलन करत यांकडून करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून विरोधकांचा भडिमार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या