25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरसोलापूर शहरात सर्वत्र शुकशुकाट, अत्यावश्यक सेवा सुरु

सोलापूर शहरात सर्वत्र शुकशुकाट, अत्यावश्यक सेवा सुरु

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर : महाराष्ट्रात ( 14 एप्रिल) रात्री 8 वाजतापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी नाकाबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून येत आहे. सोलापुरात सर्व ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर सोलापुरातील रस्त्यांवरही गर्दी पाहायला मिळत नाहीय. अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद आहेत. विनाकारण घराबाहेर पडल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्याने 15 दिवस कडक संचारबंदी लागू केली आहे. नव्या निर्बंधानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी रात्री उशिरा आदेश काढले आहेत.

होम डिलेव्हरी व पार्सल सेवेला काही प्रमाणात सूट दिली आहे. महापालिका हद्दीतील बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला रात्री दहापर्यंत होम डिलेव्हरी आणि पार्सल सेवेच्या अनुषंगाने परवानगी दिली आहे. ऑर्डर देण्याच्या उद्देशानेकिंवा ऑर्डर घेऊन जाण्याच्या उद्देशाने कोणीही भेट देऊ नये, असे आदेशातून स्पष्ट केले आहे. तर रूग्णांची सेवा करणा-यांना सवलत देण्यात आली आहे. प्रशासनाने सांगितलेले हेल्पलाइन नंबर, पोलीस, आरोग्य, सिव्हिल हॉस्पिटल, महानगरपालिका, दवाखाने, नजीकचे पोलीस ठाणे सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून ठेवा. त्यामुळे मनामध्ये काही शंका आली तर फोनवरून तिथे शंकानिरसन करू शकता, असे प्रशासनाच्यावतीने सांगितले जात आहे.

कारखाने आणि उद्योगातील एखादा कर्मचारी कोरोना बाधित आढळल्यास त्यांच्या संपर्कातील सर्व कामगारांचे अलगीकरण कारखाना प्रशासनाला स्वखर्चाने करावे लागणार आहे. पाचशेपेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखानाकिंवा उद्योगाच्या ठिकाणी स्वत:चेअलगीकरण केंद्र स्थापन करावे लागणार आहे. एखादा कामगार कोरोनाबाधित आल्यास हा कारखानाकिंवा युनिट पूर्ण निर्जंतुक होईपर्यंत बंद ठेवले जाणार आहे. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार हे एकत्रित बसून सेवा देण्यासाठी बंद करण्यात आले आहेत. होम डिलिव्हरी करणा-या सर्व कर्मचा-यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याची सूचनाही या आदेशात करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हर व दोन प्रवासी, टॅक्­सीकिंवा चार चाकी वाहनांमध्ये ड्रायव्हर व वाहनाच्या 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक, बस वाहतुकीसाठी आरटीओने दिलेल्या पांिसगनुसार पूर्ण क्षमतेने वाहतुकीस परवानगी दिली आहे.

चारचाकी आणि टॅक्­सी वाहनांत जर कोणत्याही एका व्यक्तीने मास्क घातला नसेल तर त्या टॅक्­सी चालकाला व मास्क न घालणारे व्यक्तीला प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. रस्त्याच्या कडेच्या खाद्य विक्रेत्यांनी रस्त्याच्या ठिकाणी ग्राहकांना खाद्यपदार्थ खाण्यास देऊ नये. ग्रामीण भागासाठी फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत तर महापालिका हद्दीत सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत सर्व दिवशी देता येणार आहे.

या कालावधीत सिनेमा हॉल, नाट्यग्रह, सभाग्रह, मनोरंजन पार्क, व्हिडिओ गेम पार्लर, वॉटर पार्क, क्­लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, चित्रपट आणि सिरियल आणि जाहिरातीचे चित्रीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. धार्मिक स्थळांमध्ये दैनंदिन नित्य उपचार सुरु राहतील, परंतु बाहेरील व्यक्तींना मनाई असणार आहे. शाळा व महाविद्यालय बंद राहणार असून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे. केश कर्तनालय, स्पा, सलून व ब्युटी पार्लर ही दुकाने बंद राहणार आहेत.

विवाह स्थळ, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी सर्व कर्मचा-यांचे अभ्यंगतांचे लसीकरण अथवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आवश्­यक आहे. लसीकरण अथवा कोरोना निगेटीव्हचे प्रमाणपत्र नसल्यास अशा व्यक्तीला एक हजार रुपये दंड केला जाणार आहे. विवाहस्थळ अस्थापनांना दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. लग्नासाठी जास्तीत जास्त 25 जणांना तर अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.

‘लाडकी’ खलनायिका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या