26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeसोलापूरशहरात रूग्णवाढीचा वेग मंदावला

शहरात रूग्णवाढीचा वेग मंदावला

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहरातील ३४०६५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत शहरात ४९८५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून ३५९ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ५६ पॉझिटीव्ह रूग्ण सापडले असून राजेश कोठे नगर, नेहरूनगर, कोंडा नगरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. ३७ रूग्णांना घरी सोडण्यात आले. ३०३६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांनी दहा दिवसांचा कडक लॉकडाउन केला. त्याचे परिणाम दिसू लागले असून गेल्या काही दिवसात कोरोना रूग्णांची संख्या घटली आहे. शुक्रवारी शहरात ९७६ पैकी ५६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर तिघांचा मृत्यू झाला.

न्यू पाच्छा पेठ, पुनम नगर, डिमार्ट जवळ (जुळे सोलापूर), मंजुषा सोसायटी (विकासनगर), सिध्दीविनायक नगर, शिवसृष्टी बनशंकरी नगर, वर्धमाननगर,सन्मित्रनगर (शेळगी), राजेश कोठे नगर, राऊत वस्ती (मजरेवाडी), आवंतीनगर (मुरारजी पेठ), कोंडानगर (एसव्हीसीएस शाळेजवळ), आसरा चौक, हरिपद्म सोसायटी, मार्कंडेय नगर (कुमठा नाका), कुमठा तांडा, मड्डीवस्ती (कुमठे), साईनगर, महालिंगेश्वरनगर (होटगी रोड), विद्यानगर (उत्तर सदर बझार), कुमठे, युनिक रेसिडेन्सी (अशोक चौक), रेल्वे लाईन गणेश मंदिराजवळ (रामवाडी), वज्रेश्वरी नगर (अक्कलकोट रोड), सिध्देश्वर पेठ शिवगंगा मंदिराजवळ (प. मंगळवार पेठ), कित्तुर चनम्मा नगर (सैफुल), यशनगर, गोकुळनगर, पाटीलनगर (विजापुर रोड), राघवेंद्र प्लॅटीनम परिसर, तोडकर वस्ती (बाळे), गुलमोहर सोसायटी (वसंत विहार), राघवेंद्र नगर, हत्तुरे वस्ती, रेसिडन्सी क्वार्टर (मार्कडेंय रूग्णालयाजवळ), जोडभावीपेठ कस्तुरबा मार्केट जवळ या ठिकाणी नव्या रूग्णांची भर पडली आहे.

कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संपर्कातील किमान ८ ते १० व्यक्तींची संस्थात्मक विलगीकरण केंद्रात रवानगी करण्याचे महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केले. त्यानुसार काही दिवस कार्यवाही झाली. मात्र दररोज शहरात सरासरी ५० हुन अधिक रूग्णांची भर पडत आहे तरीही संस्थात्मक व होम क्वॉरंटाईन व्यक्तींमध्ये म्हणावी तशी वाढ झालेली नाही त्यामुळे कोरोना बाधीत रूग्णांच्या संपर्कातील किती व्यक्तींना क्वॉरंटाईन केले जाते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
जिल्हयातील ग्रामीण भागात ३४५९ रूग्ण पॉझिटीव्ह असून ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. १४०४ जणांवर उपचार सुरू असून १९५७ जण बरे झाले आहेत.

Read More  हिंगोलीत कोरोनाचा धोका वाढला!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या